*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 33*

      पॅरीसला जाण्यासाठी घराबाहेर पडलो.स्किफॉल एअरपोर्टवरुन इंटरसिटी ट्रेन होती.टॅक्सीड्रायव्हरने एअरपोर्टच्या दारात सोडले.डोमेस्टीक एअरपोर्ट आणि ट्रेनचा एकच एन्ट्रन्स आहे.आत गेलो.जीना ऊतरुन खाली गेलं  की ट्रेन स्टेशन येतं.तिथुनच बेल्जीयममधल्या ब्रुसेल्स येथुन दुसरी ट्रेन होती.इंटरसिटीने ट्रेनने ब्रुसेल्सला पोहोचलो.पहिली ट्रेन लेट झाली.त्यामुळे धावतच दुसरी ट्रेन पकडली. दारातच टी.सी.ने पासपोर्ट  आणि तिकीटस चेक केले.अॅमस्टरडॅम ते पॅरीस जाणारी ट्रेन होती.नेदरलँडस,बेल्जीयम आणि फ्रान्स या तीन देशांमधुन धावणारी ही ट्रेन.या ट्रेनचे नांव थॅलीस ट्रेन असे आहे.( THALYS )

देशांंर्तगत ट्रेन असल्याने तीला साजेशीच अशी आतली सुखकारक सोय होती.मोठ्या बॅग्ज ठेवण्यासाठी दरवाजाच्याच बाजुला मोठे रॅक्स होते.आतल्या बाजुला दोन दोन सीटसच्या रांगा होत्या.वर विमानात असतात तसे कंपार्टमेंटस असतात.विमानात वायफाय,चार्जिंग पॉईंटस असतात.वर एसीची,लाईटसची बटणे होती.समोरच छोटे फोल्डींग टेबल होते.ट्रेनच्या आतल्या भागात एक इलेक्ट्रॉनीक डिसप्ले बोर्ड होता.त्यावर ट्रेनचे नांव आणि स्पिड दिसत होते.थोड्याच वेळात ट्रेन सुरु झाली.हळुहळु स्पीड वाढु लागला.शंभर,दोनशे,अडीचशे,दोनशे सत्तर करत शैवटचा आकडा दोनशे ब्याण्णव पर्यंत गेला.थोडक्यात तीनशे किलोमीटर प्रतीतास या वेगाने ट्रेन पॅरीसच्या दीशेने धावु लागली.बाहेरचा स्पीड आत अजिबातच जाणवत नव्हता.इतकी ट्रेन स्टेडीली धावत होती.

ट्रेनमध्येच पँट्रीकार होती.तेथुनच सँडवीचेस आणि कॉफी आणली.धावपळीत असतांना भुकेची जाणीव नव्हती.पण ट्रेनमध्ये बसल्यानंतर ती झाली.

     स्फिफॉल एअरपोर्ट ते ब्रुसेल्स दोन तासाचा प्रवास होता.पुढचा ब्रुसेल्स ते पॅरीस एक सव्वातासाचा प्रवास होता.

ब्रुसेल्स सोडल्यानंतर कालव्यांची संख्या कमी होत जाते.दोन्ही बाजुला हिरवीगार मैलोन मैल पसरलेली हिरवीगार शेती दिसत होती.नजरेसमोरुन हिरवेगार पट्टे सरकुन जात होते.मधे मधे भरपुर झाडी होती.जंगलासारखीच.हिरव्यागार शेतात चरणाय्रा पांढय्राशुभ्र गुबगुबीत केसाळ मेंढ्यांचे कळप चरतांना दिसत होते.तर कुठे पांढय्रा रंगाच्या गायींचे कळपही दिसत होते.बय्राच शेतकय्रांकडे घोडेही पाळलेले दिसतात.बहुधा एवढी पसरलेल्या अवाढव्य  शेतीवर लक्ष ठेवण्यासाठी घोड्यांचा वापर करत असावेत.

   इकडे विजनिर्मितीसाठी पवनचक्क्या खुप दिसल्या.दर दहा किलोमिटर अंतरावर पवनचक्क्यांचे दहा पंधरा ऊंच टॉवर दिसले.त्यावरची भलीमोठी पाती संथपणे फिरत होती.हिरव्या शेतांमध्ये हे ऊंच पांढरेशुभ्र फिरणाय्रा पात्यांचे टॉवर अगदी ऊठुन दिसतात.

या खेरीज प्रत्येक शेतकय्राच्या घरांवर सोलर पॅनेल बसवलेले दिसले.विज निर्मितीत स्वयंपूर्ण होण्याचा  हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे.असलेल्या साधनांपासुन विज निर्मिती करणं कसं शक्यआहे  हे त्यांनी दाखवुन दिलंय.कारण इकडे आपल्यासारखी मोठी धरणे नाहीतच.त्यामुळे वीजनिर्मिती होऊ शकत नाही.

  घरांची रचना बैठी.ऊतरत्या छपराची.पण यावेळी छप्पर कोकणातल्या घरासारखे लाल कौलारु असे दिसले.काही ठिकाणी दगडी शाळेची पाटी असते,त्या रंगाची कौलारु घरे दिसली.

इथली माती मात्र पांढुरकी,सफेद होती.लाल किंवा काळी नाही.

प्रवास करतांंना मजा वाटत होती.हायस्पीड बुलेट ट्रेनचा प्रवास सुसाट वेगाने होत होता.

अजुन एक आढळलेली बाब म्हणजे बरेचसे इकडचे लोक.प्रवासात वाचन करतांना दिसतात.तरुण मंडळी जास्त.बय्राच जणांकडे एक तरी पुस्तक असतेच.त्यात ती हरवुन गेलेली असतात.एअरपोर्टच्या रांगेत पण वाचन चालु असते.

  किंवा काहीजण लॅपटॉपवर काम करतांना दिसतात.बरीच मुले मोबाईलवर चेस खेळतांना पण बघीतली आहेत.

  अजुन एक म्हणजे इथले बहुतांश लोक प्रवासात स्वत:चे खाद्यपदार्थ घरुनच आणतात.सीटी बसचा प्रवास,लोकलचा प्रवास किंवा इंटहसिटी अथवा दोन देशांमधला प्रवास सगळ्याच ठिकाणी आपले आपले खाणे घरुन तयार करुन आणतात.ब्रेड,चीज,फळं,पोळीसारखा रॅप केलेला,भाज्या,सॅलड घातलेला पदार्थ.भुक लागली की बॅगेतुन काढुन खातात.ट्रेनमध्ये चढतांना  एखादा कॉफीचा मग घेतला की झालं.बाहेरचं खाण्याकडे कल नसतो जास्त.

असा हा थॅलीस ट्रेनचा प्रवास सुरु झाला म्हणता म्हणताच  संपायची वेळ झाली.ट्रेनमधल्या अनांऊन्समेंटमुळे पॅरीस आल्याची आठवण करुन दीली.

   ट्रेनचा स्पीड मंदावत गेला आणि ट्रेन प्लॅटफर्मवर येऊन थांबली.पॅरीस. एक नवीन देश .नवीन शहर.नवीन स्थळं पाहण्यासाठी ऊत्सुक मन.

  समोर नांव होतं. PARIS  GARE  DU NORD.

 पॅरीसचं नॉर्थ स्टेशन.

   अरे हो एक सांगायचं राहिलं.

 ही ट्रेन कुठेही थांबत नाही बरं का.अगदी नॉन स्टॉप.ब्रुसेल्स ते पॅरीस.

 

*सौ.पुर्वा लाटकर अॉमस्टरडॅम*

Comments