*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 35*


लुव्र म्युझीयिमच्या आवारातुनच पॅरीसच्या आयफेल टॉवरचे पहिले दर्शन झाले.अगदी जवळ असा वाटला.पण बसच्या अर्ध्यातासाच्या प्रवासानंतर त्या भागात पोहोचलो.काही मिनिटे चालल्यानंतर अायफेल टॉवर जवळ पोहोचलो.

   जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेला टॉवर.त्याच्या भव्यतेमुळे आणि ऊंचीमुळेच आपण अवाक होतो.

     अनेकदा फोटोत,टिव्हीवर ,चित्रातुन बघीतलेला हा टॉवर ग्रे कलरचा दिसतो.प्रत्यक्षात मात्र पिवळसर रंग आहे.मस्टर्ड कलरचा आहे.

एका दृष्टीक्षेपात मावणं केवळ अशक्यच.मान ऊंच करुन त्याच्या वरील मजल्यांकडे पाहावे लागते.984 फुट ऊंच असलेला हा आयफेल टॉवर, 1889साली बांधलेला आहे.जागतिक व्यापार प्रदर्शन त्यावेळी पॅरीसमध्ये भरवले होते.त्यावेळी बांधकामात आणि वास्तुरचनेत काहीतरी वेगळं करायचं यासाठी रॉट आयर्न वापरण्यात आलं.याचं डिझाईन आणि आर्कीटेक्चर गुस्ताव आयफेल या आर्किटेक्टने केल्याने याचं नावं आयफेल टॉवर असं पडलं.याच्या डिझाईनमुळे आणि भव्यतेमुळे सगळेच आश्चर्यचकीत झाले.

   आज जगभरातुन सात लाखाच्यावर पर्यटक येथे येतात.पॅरीस आणि आयफेल टॅावर हे आकर्षणाचा केंद्रबिंदु बनले आहे.

टॉवरच्या चार बाजुच्या पायाभोवती आकर्षक गार्डन आहे.अनेक वृक्ष आहेत.बसण्यासाठी बाक आहेत.हिरवळीवर बसुन निवांतपणे आयफेल टॉवर न्याहाळता येतो.थोडीफार खाण्याची व्यवस्था आहे.बाकी तशा फारशा सोयीसुविधा नाहीत.

टॉवरच्या काही मजल्यांपर्यंत जाण्यासाठी लिफ्ट,केबल कार आहेत.त्यासाठी प्रचंड गर्दी होती.त्यामुळे खालुनच आयफेल टॉवरचा आनंद घेतला.

 रात्री आयफेल टॉवरवर लाईट शो असतो.रंगीत लाईट सोडुन आयफेल टॉवर ऊजळुन टाकतात.डोळ्यांचं पारणं फेडणारा हा शो,वेळेअभावी बघता आला नाहि.

सध्या इकडे सुर्यास्तच दहावाजता होतो.रात्री पूर्ण काळोख झाल्यावरच अकरा वाजता हा शो सुरु होणार होता.त्यामुळे तिथुनच यु टर्न घेतला.जवळच्याच इंडीयन रेस्टॅरंटमध्ये जेवलो.तेथुनच हॉटेलसाठी टॅक्सी केली.

 आयफेल टॉवरची ऊंची,भव्यता मनांत,कॅमेय्रात  साठवत,टॅक्सीतुन वाकुन बघत त्याला बाय केलं.

सॉरी तीला बाय केलं कारण आयफेल टॉवरचं लाडकं संक्षिप्त नांव आहे 'IRON LADY'


*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments