*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 37*

   सॅक्राकोर  .पॅरीसमधील आयफेलटॉवर नंतर असणारे दुसरे प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ.

सॅक्राकोर हे रोमन कॅथॉलीक चर्च आहे.त्याला बॅसिलीका अॉफ सेक्रेड हार्ट मॉंटमात्रे असं म्हणतात.

पॅरीस जवळच्या ऊंच डोंगरावर हे सॅक्राकोर ऊभारलेलं आहे.व्हाईट लाईमस्टोनमध्ये हे भव्य डोम असलेलं चर्च  बांधलेले आहे.साधारणत:तीनशे पायय्राचढुन  या चर्च पर्यंत पोहोचता येते.या शिवाय केबलकारचीही सोय  आहे येथुनच संपूर्ण पॅरीसशहराचे विहंगम दृश्य दिसते.आयफेलटॉवरही दिसतो.. इथेच एक 'जिवंत पुतळा देखील बघीतला.पांढय्राशुभ्र  वेषात तो हुबेहुब पुतळ्यासारखाच ऊभा होता.लोक जवळ गेले ही हालचाल करायचा.डोळे मिचकवायचा.आधी लोक घाबरायचे .नंतर त्याच्यासौबत फोटो काढुन घ्यायचे.आम्ही गेलो तेंव्हा कडक ऊन  होतं.आम्ही केबलकारनेच पोहोचलो.चर्चच्या  पायथ्याशी.  तीथल्या लोखंडी जाळीला शेकडो  छोटी छोटी कुलुपे अडकवलेली दिसली.

त्याबद्दलची माहीती अशी की प्रियकर अथवा प्रेयसी किंवा पती पत्नी देखील आपल्या जोडीदाराशी आपली गाठ निरंतर राहावी,त्याचे प्रेम सदैव मिळावं.आपसातलं नातं अखंड टिकावं म्हणुन कुलुपावर त्याचं किंवा तीचं नांव लिहुन ते कुलुप त्या जाळीला लावुन कुलुपबंद करतात.सोबत असलेली चावी पॅरीसच्याच सेन नदीत टाकुन देतात.योगायोगाने त्याचदिवशी वटपौर्णिमा होती.मनांत  विचार आला वट पुजणारी स्री आणि प्रियकराच्या नांवाने कुलुपबंद करणारी युरोपियन स्री दोघींच्या भावना एकसारख्याच.आहे ना गंमत!

 साक्राकोर हे चर्च जिझसच्या पवित्र ह्रदयाचे ठिकाण आहे.त्यामुळे याला खुप महत्व आहे.येथे अनेक वर्ष तपश्चर्याकरुन हे स्थान पवित्र बनलं आहे.त्यामुळे कॅथालिक लोकांचं हे परमभक्तिचं श्रद्धास्थान आहे.त्यामुळेच येथे प्रचंड गर्दी होती.पहिल्यांदाच युरोपमधल्या एखाद्या स्थळी एवढी गर्दी पाहीली.शेकडो लोकांनी चर्च आणि अाजुबाजुचा परिसर गजबजुन गेला होता.

 हे चर्च अजुन एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे लग्न!हो लग्नच!अनेक तरुण तरुणी येथे लग्नगांठबांधायला या पवित्र ठिकाणी येत असतांत.त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक,मित्रपरिवार हे सगळेही सोबत असतात.त्यामुळेही येथे गर्दी असते.अनेक व्हाईटगाऊनमधील  गोय्रापान सोनेरी केसांच्या तरुणी आणि सुटाबुटातला नवरदेव यांचे दर्शन घडतेच.लग्न झाल्यानंतर ऊघड्या लांबलचक गाडीतुन मित्रमंडळी आणि नवरानवरीची वरातही निघते.मोठ्यांंने हॉर्न वाजवत गर्दीतुन वाट काढत,मित्रमंडळी टाळ्या वाजवत फुग्यांनी सजवलेल्या गाडीतुन जल्लोश व्यक्त करतांना दिसतात.

     इथे येणाय्रा मेनरोडवर दोन्ही बाजुला वेडींग गाऊन,सुटस,बुट,वेडींग इव्हेँटस,फ्लॉवर डेकोरेशनची अनेक  दुकाने दिसली.एवढी दुकाने 'लग्नाच्या बस्त्याची' का असावीत असा सहज प्रश्न मला पडला होता ,त्याचं ऊत्तर मिळालं.पुण्यातल्या लक्ष्मीरोडसारखाच हा रस्ता मला वाटला.फरक फक्त पोशाखांचाच.

    एकंदरीत गजबजेला परिसर थोडासा बघुन आम्ही परत केबलकारने ऊतरलो.

पॅरीस हे खिसेकापु,चोय्रा,हातचलाखी यासाठी कुप्रसिद्ध आहे.एवढ्या गर्दितच अनेक जादुचे खेळ दाखविणारे,मनोरंजनाचे खेळ दाखविणारे लोकही असतात.ऊत्सुकता म्हणुन त्यांच्या सभोवती अजुन गर्दी जमते.तिथल्या दुकानातुन काही सोवेनियर घेतली त्यानेही सांगीतले खीसा पाकीट,पासपोर्ट सांभाळा.

येथुनच आम्ही परतीच्या बसस्टेशनकडे जाण्यासाठी कॅबकेली.

एका फ्रेँच रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा,बर्गर असं मिळेल ते पोटात ढकललं .पुढचा सहा तासांच्या नॉनस्टॉप बसप्रवासात  काहीही खायला मिळणार नव्हते.

इथल्याच  एका आंतरराष्ट्रीय बस प्रवासी थांब्यावरुन FLIX  बसने आमचा पुढचा प्रवास होणार होता.

या 'अगदी निराळ्या' आंतरराष्ट्रीय बस स्टँडबद्दल ऊद्याच्या भागात!


*सौ.पुर्वा लाटकर*

Comments