*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख  लेख 38*


 GARE DE BERCY  SEINE 


हे नांव आहे आंतरराष्ट्रीय FLIX BUS STATION चं.टॅक्सिने आम्हांला या बसस्टेशन पर्यंत आणुन सोडलं.बघीतलं तर  समोर एक बोगद्यातुन जाणारा रस्ता दिसत होता.बोगद्यातुनच पांच सांत मिनिटे चालल्यानंतर बस दिसु लागल्या.आत तसा बय्रापैकी काळोखच होता.अनेक लांबलचक बसेस थांबल्या होत्या,सुटत होत्य. जवळपास 35,40  तरी प्लॅटफॉर्म्स असावेत.प्लॅटफॉर्म ओलांडुन आम्हि पलीकडे गेलो.पलिकडचा नजारा एकदमच वेगळा होता.ते होतं चक्क भलं मोठं,लांब रुंद असं गार्डन! होय गार्डनच.अनेक प्रवासी येथे बॅगा घेऊन येतांना दिसत होते.विस्तिर्ण असं गार्डन.त्यात मोठमोठे वृक्ष होते.हिरविगार लुसलुशीत अशी हिरवळ होती.काही ठीकाणी बसायला बाके होती.काही ठिकाणी मोठमोठे दगड,लाकडाचे ओंडके बसण्यासाठी होते.एका बाजुला ओपन जीम होते.त्यात अनेक व्यायामाची साधने होती.बरीच तरुणाई तेथे घाम गाळतांना दिसली.बसस्टॅंडसमोरच एक इलेक्ट्रॉनीक डिसप्ले बोर्ड होता.त्यावर कोणती बस लागलीय.हे कळत होते.त्यानुसार प्रवासी आत जात होते.अनेक प्रवासी सहलीला आल्यासारखे हिरवळीवर बसले होते.कोणी पुस्तक वाचत होते,तर कोणी चक्क पाठ टेकवुन झोपले होते.एका बाजुला सुंदर असं रोझ गार्डन होतं.अनेक जातींची,विविध आकाराची ,रंगांची गुलाबफुले पर्यटकांना आकर्षित करीत होते.एका बाजुला अनेक झाडे दुतर्फा ओळीत लावली होती.घनगर्द सावली आणि थंडावा ऐन दुपारच्या तलखीत जाणवत होता.येथेही बाके टाकुन प्रवाशांची सोय केली होती.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती .एकेठिकाणी आईस्क्रीमचा स्टॉल होता.बाकी काहीही खाण्यापिण्याची सोय नव्हती. 

बसस्टेशनच्या बाजुलाच अनेक पायय्रा होत्या.त्या चढुन गेल्यावर वर मेनरोडला जाता येत होतं.

     असं एकंदरीत अगदी निसर्गाच्या रम्य वातावरणातलं बसस्टेशन खुपच आगळं वेगळं वाटलं .सहसा कोठेही न आढळणारं,प्रवाशांना सुखावणारं.आकर्षित करणारं.यासाठीच हा लेख प्रपंच.मंडळी कसं वाटलं हे बसस्टँड !आवडलं ना!


   *सौ. पुर्वा लाटकर*

Comments