⛱️⛱️⛱️🌨️🌨                 पावसाळ्यातली एक अाठवण! 'नेमेची येतो पावसाळा'याप्रमाणे पावसाळा जवळ अाला की छत्र्या,रेनकोट,गमबुट,पावसाळी चप्पल्स इत्यादीची जुळवाजुळव चालु होते.बाकी सगळं काढून ठेवलं होतं.माझी छत्री पण मेनडोअरच्या जवळच खीळ्याला अडकवलेली होती त्यामुळे मी निर्धास्त होते.येऊ दे कधीही पाऊस मी अगदी तय्यार अाहे अशा भावनेत मी होते.एका सायंकाळी पाऊस भरुन अालेला,मी बाहेर पडण्याच्या तयारीत असतांना छत्री हातात घेतली.ऊघडून तरी पहावी म्हणुन जोर लावुन बटणाने ऊघडली पण 'हाय रे दैवा!'छत्रीच्या साय्रा तारा मान टाकल्याप्रमाणे पडल्या,काही स्क्रू खाली,काही हातात पडले.छत्रीचं कापड शीड नसलेल्या नौकेसारखं फडफडु लागलं.मी हताश होऊन छत्रीकडे बघत राहिले.शेवटी सगळे स्क्रु,तारा,मोडकी छत्री प्लॅस्टीकच्या पीशवीत टाकून बाहेर पडले.ही अशी छत्री दुरुस्त होण्याच्या पलीकडच्या अवस्थेत होती.तरीही बघू,टाकु दुरुस्तीला म्हणून  ती जवळ बाळगली.पावसाची भुरभुर चालू झाली होती.रस्त्यावर सगळ्यांकडे छत्र्या,रेनकोट घातलेले होते.मीच एकटी पावसात भीजत निघाले होते.त्या सगळ्यांकडे पाहुन जरा जेलस व्हायला झालं,भिजतांना थोडं वाईटही वाटत होतं.चालता चालता छत्री दुरुस्त करणाय्रा माणसाकडे अाले.त्याच्याभोवती बय्राच जणांचा गराडा होता.अापल्याकडे साधारणत: जे चप्पल दुरुस्तीचं काम करतात तेच,छत्र्या दुरुस्तीचं काम पावसाळ्यात करतात.त्यामुळे गर्दी असणं स्वाभाविकच होतं.शेवटी गर्दी जरा कमी झाल्यावर मी पुढे सरकले 'हातात छत्री घेऊन म्हणाले,'भय्या ये छत्री....' 'हां हां रखदो ऊधर.कल लेके जाना'मान खाली घालुन काम करत असलेल्या भय्याने माझ्याकडे अाणि माझ्या छत्रीकडे ढुंकुनही न बघता तो ऊत्तरला.मी त्या गराड्यातुन बाहेर पडले.शेवटचं एकदा पाहावं म्हणुन मागे वळून छत्रीकडे पाहीलं.मनांतच अलविदा केलं

अाता छत्री विकत घेणे अत्यंत गरजेचं अाणि निकडीचं झालं होतं,म्हणुन छत्री घेण्यासाठी दुकानात शिरले.ही दाखवा,ती दाखवा,ही ऊघडुन बघ,ती ऊघडुन बघ करत ,पर्सला परवडेल अशी अाकाशी रंगाची,फुलंफुलं असलेली छत्री विकत घेतली.मी अाता अगदी अानंदात होते.अाता  पड म्हणावं जोरात माझ्याकडे नवीकोरी छत्री अाहे.पण मघाशी जातांना मला भिजवणारा तो गायब झाला होता.वरतुन मला खुलं अाभाळ वाकुल्या दाखवत होतं जणू.

दुसय्रा दिवशी पुन्हा संध्याकाळी फिरायला बाहेर पडले.सोबत माझी नवीकोरी अाकाशी रंगाची छत्री घेतली अगदी न विसरता!परत येतांना जरा वाट वाकडी करुन कालच्या छत्रीवाल्याकडे गेले.'भय्या छत्री 'म्हणेपर्यंत त्याने माझी छत्री समोर टाकली,'हो गयी!' मी अाश्चर्य,अविश्वास,अानंद या सगळ्याभावनांमध्ये बुडून गेले.'हां हां खोलकर देख लो', मी ती छत्री दोन तीनदा ऊघडझाप करुन पाहीली.एकदम तंदुरुस्त झाली होती माझी लाडकी,अावडती छत्री.'भैय्या कीतना हुअा?'बीस रुपये' .मी चटकन वीसची नोट त्याच्या हातात सरकवली.अाणि अक्षरश: ऊड्या मारत( मनांतल्या मनांत हं नाहीतर तुम्हांला वाटायचं रस्त्यावर) मी घरी अाले.येतांना अमिताभचा डायलॉग ऊगीचच अाठवला.'मेरे पास अब दो दो छत्री है!'असो .तरी अशी होती माझ्या लाडकीची 'छत्रकथा'

डोक्यावर छत्री नसेल अाणी मायेचं ,प्रेमाचं छत्र नसेल तर अापण अगदीच ऊघडेबोडके पडतो.⛱️⛱️🌨️⛱️⛱️

  सौ.पुर्वा लाटकर पुणे.⛱️⛱️अाठवण मात्र अलिबागची⛱️⛱️

Comments