🌲🌲🌲काल समोरच्या अशोकाच्या झाडाची छाटणी केली.एखादी दुसरी लहानशी फांदी सोडता झाडाचा बुंधा शिल्लक ठेवला होता.झाड अगदी ओकेबोके दिसत होते.झाडावर रोजच कोकीळ,कोकीळा,बुलबुल,कबुतर ,मैना,कावळे,कॉमन टेलर  बर्ड,सनबर्डस,मुनीया,कधीतरी भारद्वाज हजेरी लावत असत.मुनीया तर रोज गवताच्या लांबसर रिबीनीसाख्या हिरव्या पट्ट्या तोंडात धरुन घरटे बांधण्याच्या तयारीत होती.झाडाच्या छाटणीने या सगळ्यांचे अाश्रयस्थान एकाएकी नाहिसे झाले.मलापण रोज दृष्टीला पडणारा हिरवा नजारा नाहीसा झाल्याने मन खट्टु झालं.अाता पक्षी नाहीत,किलबील नाही,त्यांचे निरनिराळे विभ्रम नाहीत.हाय.......संपलं सगळं. न राहवुन त्या ऊघड्याबोडक्या बुंध्याकडे नजर जातेच.पुन्हां पालवी फुटेपर्यंत हा बुंधा नजरेला बोचत राहीलच.काहीतरी हरवल्याची,हरल्याची भावना सतत येत होती.ऊदास वाटत होतं.पण अाज सकाळी ऊठल्यावर बघीतलं तर त्याच ऊघड्याबोडक्या फांद्यांवर बसुन बुलबुलाची जोडी सुरेल गाणी गात होती.हे बघुन काल मनाला अालेली मरगळ क्षणार्धात नाहीशी झाली.ज्यांचं घरटं तुटलंय ते पक्षी प्रचंड अाशावादी दिसले.त्याच्याकडे पाहुन वाटलं की 'पडुदे कितीही घाव,तुटुदेत जिवंतपणाच्या हिरव्यागार फांद्या,मनांत दुर्दम्य इच्छा असली की सगळं पुन्हां ऊभं करता येतं.'कदाचीत याच अाशावादाने ती बुलबुलजोडी मजेत गाणे गात असावी.ते पाहुन माझ्या मनांतही ऊर्जेचेस्त्रोत वाहु लागले.🌲🌲खुप काही शिकण्यासारखं असतं ना अापल्या अाजुबाजुला ते बघण्यासाठी चित्तचक्षु अाणि मन:चक्षु ऊघडे हवेत!होय ना!🌲🌲                                           सौ. पुर्वा लाटकर,पुणे 23 जुन2020🌲🌲🌲🌲🌲🌲🌲

Comments