' नाती'.............सौ.पुर्वा लाटकर. काही नाती असतात पूर्णविरामासारखी जन्माला आल्याबरोबरच चिकटतात. आणि आयुष्याच्या विरामापर्यंत सोबत करतात... काही नाती अर्धविरामासारखी असतात. आयुष्याच्या कोणत्यातरी वळणावर अचानक भेटतात अर्धिच वाट चालून साथ सोडून जातात. काही नाती असतात स्वल्पविरामासारखी अगदी अल्पकाळासाठी ती आयुष्यात येतात. त्यांची काही फारशी अपेक्षाही नसते थोड्याशा सहवासातही ती समाधानी असतात. काही नाती असतात ऊद्गारवाचकचिन्हांसारखी काही कल्पना नसतानांही ती आपल्या आयुष्यात येतात .थोड्याशा अपघाताने .कधी सुख तर कधी व्यथा देऊन जातात. काही नाती असतात प्रश्नांकित. काय बरं प्रयोजन असेल या नात्यांचं का आली असावीत आपल्या आयुष्यात. मनात आणि चेहर्यावर सतत प्रश्नार्थकरूपी लांब चेहरा घेऊन वावरत असतात. काही नाती असतात एकेरी अवतरणचिन्हांसारखी जी तुम्हांला व त्यांना ठेवू पहातात एका वेगळ्याच कक्षेत. आणि मिरवू पहातात त्यांचं ,तुमचं नातं. काही नाती असतात दुहेरी अवतरण चिन्हांसाऱखी ती असतातच स्पेशल तुम्हांला प्रसिध्दि देण्यासाठी त्याचं, तुमचं असं खास " अवतरणातलं" गूज तुम्हाला सांगू पहाणारी. काही नाती असतात कंसातल्यासारखी एका विशीष्ट. परिघापर्यंतच याची मजल असते आपल्याच कोषात जगू पहाणारी आणि तुम्हांलाही तसंच करायला भाग पाडणारी. नाती येतातच मुळी काही ना काही लेबल लावून काही ना काही बिरूदं मिरवत पण एकच नातं असं जिथं कुठलंच ' चिन्ह' नसतं................................. कुठलीच अपेक्षा नाही.जिथं तुझं माझं नाही देणं घेणं नाही कुठलीच मागणी नाही असं एकच नातं निरलस निस्वार्थि खळाळत्या झय्रासारखं.....,........मैत्रीचं ...मैत्रीचं.
Comments
Post a Comment