🌹🌹🌹🌹🌹माऊली🌹🌹🌹🌹.------------- सौ.पूर्वा लाटकर.  शेकडो वर्षांपूर्विची परंपरा असलेला वैष्णवांचा मेळा आळंदी ते  पंढरपुर पायी चालत वारी करतो.एका अनामिक ओढीने भारल्यासारखे  सगळेच जण विठूरायाच्या दर्शनासाठी  जात असतो.वारी ही दुरून बघण्याची बाब नसून अनुभवण्याची गोष्ट आहे.  भावार्थ दिपीकेमधील एक तरी  ओवी अनुभवावी तसंच वारीचंही आहे.आज अनेकजण या वारीकडे ओढले जात आहेत.दिवसेंदिवस याची महती वाढतच आहे.वारीत गेलेल्या प्रत्येकाच्या तोंडी एकच परवलीचा शब्द असतो तो म्हणजे ' माऊली' .ज्याच्या दर्शनासाठी तुम्ही आतुर झाला आहात ती विठुमाऊली.वारीत येणारा प्रत्येकजण मग ती स्त्री असो वा पुरूष सगळेच माऊली.सानथोर माऊलीच.माऊली या एका शब्दाने गरीब- श्रीमंत, ऊच्च-नीच,शिक्षीत - अशीक्षित,जात- पात या सगळ्या भिंती गळून पडतात.सगळ्यांनाच एका समान सुत्राने बांधण्याची ताकद या एकाच शब्दात आहे.सगळे वारकरी माऊली म्हणूनच नमस्कार करतात.माऊली या नावानेच हाक मारतात.विचारपुस करतांनाही माऊलीच.खरं तर आई या शब्दाशी साधर्म्य असणारे अनेक शब्द आहेत. पण माऊली म्हणजे अक्षरश: प्रेमाची साऊली वाटते.प्रत्येकावर छत्रछाया धरणारी .सगळे दुख: , वेदना विसरायला लावणारी.माऊली म्हंटलं की दुखरे पाय आपोआप चालू लागतात.माऊली तुमच्या सगळ्या ईच्छा पुरवते लाड करते.तुम्हाला तहान लागली असेल तर पाणी पाजते.भुक लागली असेल तर खाऊ घालते.तुमच्या खाण्यापिण्याचे कोडकौतुक करते.पण खय्रा वारकय्राला याची तमा नसते.या वारीत एखादी माऊली तुमचे दुखरे दाबून देते.मलम लावून देते.जखमांना पट्टी लावून देते.तुमच्या मनीच्या सगळ्या मनिषा पुरवते.माऊली हा असा password आहे की जिथे ' खुल जा सीम सीम' असं म्हंटल्यावर अलीबाबाची गुहा ऊघडावी तशी सुखाची दारं ऊघडली जातात.कोणत्याही शब्दात एवढी जादू नसेल एवढी ताकद या एकाच शब्द आहे. प्रत्येक वारकय्राच्या ठायी ही विठुमाऊली वसलेली असते. शेकडो माऊलींना माझा साष्टांग दंडवत.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼.मग बोला 'विठोबा माऊली ,न्यानोबा माऊली.तुकोबा माउली.माऊली माऊली माऊली......................

Comments