शू  SSSS कोणीतरी  आहे तिथं...................................

.सौ.पूर्वा लाटकर.......................................निरव शांततेला छेद देणारा रातकिड्यांचा किरकिराट.वाढत्या काळ्या रात्रीसोबत.बरोबरीला डराव डराव असा स्पर्धा करणारा आवाज.शेजारच्याभल्या मोठ्या वेड्यावाकड्या वाढलेल्या  शिरीषावर ऊलटी लटकलेली वटवाघळं.त्यांचा एक वेगळाच चित्कार ,पंखांचा फडफडाट.सोसाट्याच्या वाय्राने हलणाय्रा माडांच्या विस्कटलेल्या झिंज्या.रात्रीच्या गर्द  अंधारातही त्या दिसतात.छपरावर पडणाय्रा पावसाच्या थेंबाचा अनियमीत आवाज.अधूनमधून कोसळणाय्रा  जोरदार सरी.काचेची थरथरती तावदानं.आपटणाय्रा खिडक्या, दरवाजे.सूं सूं करत फटीतून आत घुसू पाहणारा बेभान बेमुर्वत वारा..या सगळ्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री दुरून येणारा लोखंडी रॉडचा आवाज.ठक ठक ठक.त्या आवाजाला पण एक शिस्त आहे.दुरून येणारा हा आवाज हळूहळू जवळ येतो.अर्धवट झोपेत पेंगत असतांना डोक्यात या सळईचा ठक ठक असा दचकवणारा असतो.घरालगत अगदी स्पष्टपणे रात्रीच्या काळोखावर चरे ऊमटवणारा आवाज.क्षण दोन क्षण तो आवाज थांबतो.हातातल्या झगझगीत विजेरीने सर्व सभोवतालची पहाणी करतो.सारं काही आलबेल असल्याची खातरजमा करत तो ठक ठक करत दुर जातो.तो जाईपर्यंत कान त्याच्या आवाजाचा वेध घेत रहातात.     

         रात्र अशी सरत जाते.रातकीडे आणखीनच जोरात ओरडू लागतात.अधूनमधून वीजही दडी मारून तीचा निषेध नोंदवते.त्याचवेळी आकाशात मात्र लख्खकन वीज चमकून जाते.तीचा खिडकीच्या तावदानावर पडणारा प्रकाश  गुढतेत अजून भर टाकतो.       एक निरव शांतता....................पावसाळ्यातल्या अनेक रात्रींपैकी एक रात्र.🌩⛈🌧☔👀😳😳

Comments