साडी

 *साडी*

    

खरंंतर प्रत्येक महिलेचा आवडीचा विषय!पण का कोणास ठाऊक साडी काही माझ्या मनापर्यंत पोहोचलीच नाही.ती नेसण्यासाठी करावा लागणारा आटापिटा,त्यासाठी लागणारा जामनिमा. मॅचींग,ब्लाऊज पेटीकोट .या शिवाय त्यावर शोभतील असे दागीने.असं सगळं जमवुन मगच साडी नेसायची.नाहीतर सगळाच बेत फसतो.त्यात ब्लाऊजचं फिटींग परफेक्ट पाहीजे.साडीला फॉल बिडींग पाहिजे.

       हे सगळं झाल्यावर प्रसंग कोणता हे बघुन साडी नेसायची.जरीची,साधी,टिकल्यांची.काठपदर,कधी सोबर कलरची.काही साड्या पुन्हां पुन्हां नेसल्या जातात तर काही वर्षानुवर्षे कपाटांत पडुन राहतात.नेसु कधीतरी.का 'कधी' कधीच येत नाही.आणि घरांत,कपाटात ढीग पडुन राहतात.

      प्रत्येक साडीमागे एक आठवण नक्कीच असते.पण त्या तरी कीती वर्षे जपायच्या.शेवटी आज दहा साड्यांना 'मोकळा श्वास' दीला.आणि योग्य ठीकाणी सुपुर्द केल्या.म्हंटलं आठवणी ठेवु फक्त.बाकी ज्यांच्या गरज आहे त्या साड्या त्या भगीनी नेसतील.त्यांच्या चेहय्रावरचा आनंद हा साडीपेक्षाही जास्त देखणा असेल.

    या अाधीही पंचवीस तीस साड्या अशाच देऊन टाकल्या.देतांना ना मनांत खेद ना खंत.नको त्या मोहपाशांत गुंतणं.आता वयाच्या 'या' टप्प्यावर आनंदाचे स्त्रोत निराळे आहेत.बाह्य आनंदापेक्षा आंतरीक आनंद,समाधान जास्त भावते.हवेहवेसे वाटते.असो.

    प्रत्येकाने आपला आनंद कशात आहे तो शोधायचा असतो.घेण्यापेक्षा देण्यातला आनंद कैकपटीने मोठा असतो.

    तुमचा आनंद कशात ?शोधा!नक्की सापडेल.


*सौ.पुर्वा लाटकर*

Comments