*पावसाळ्यात*
पाऊस बनतो एक सबब,कारण अडचण
शाळा,क्लास,कॉलेजला दांडी मारण्याचे
अॉफीसला ऊशीराने जाण्याचे
मित्रांचे गेटटुगेदर टाळण्याचे
बायकोला शॉपिंगला न नेण्याचे
मुलांना दीलेली प्रॉमिसेस न पाळण्याचे
आई वडीलांना चेकअपला नेण्यात चाल ढकल करण्याचे
मैत्रिणीला भेटायला ऊशीर झाल्याचे
एखादा ठरलेला बेत रद्द करण्याचे
भिजण्याचे सर्दी ताप झाल्याचे
खोटे खोटे आजारी पडण्याचे
आपण देत राहतो कारणे
भुलथापा मारण्याचे
'तो' होता म्हणुन ...
रस्त्यात खड्डे,ट्रॅफीक जॅम, गाड्या लेट,बसच नाही आली
दरड कोसळली,गुडघाभर पाणी
आपलं खापर चक्क ' त्याच्यावर' फोडत राहतो
बरं 'त्याच्यावर' रागावताही येत
नाही
खरं खोट्याची शहानीशाही करता येत नाही
कोणीच नसतो साक्षीदार
पाऊस मग असा ठरतो ' गुन्हेगार'
'तो'ही बेटा वरुन सगळं सगळं बघत असतो.
गालातल्या गालात चक्क हसत असतो
'तो' ही वेळा चुकवतो
यायचे तेंव्हा येत नाही
बरसायचं तेंव्हा बरसत नाही
आपण जेंव्हा असतो गाफील
नेम नाही 'याचा' कधी येऊन गाठील
धो धो येऊन आपलीच घेतो परिक्षा
म्हणतो मग आपल्यालाच भोग आता खोट्या बहाण्याची ही शिक्षा.
...असा हा पाऊस असतो कधी सबब,कधी कारण कधी अडचण....कधी खोटी तर कधी खरी!🌧️🌧️🌧️
*सौ.पुर्वा लाटकर'*
Comments
Post a Comment