*पुन:श्च अलिबाग ते अॅमस्टरडॅम*लेख 11*

  

*डच नागरिकत्व*

 

नेदरलँडस किंवा सगळ्याच युरोपीय देशांमध्ये पाचव्या !सहाव्या महिन्यातच बाळाचं जेंडर सांगीतलं जातं.त्यानुसार आधीच  बाळाचे नांव काय ठेवणार आहोत ते मनांत योजावे लागते.बाळ जन्माला आले की ते नांव हॉस्पिटलला सांगावे लागते.तेच नांव कायमचे तुमच्या गव्हर्मेंट पोर्टलला नोंदवले जाते.पुढे तुमचा पासपोर्ट ,शाळा,सर्टिफिकेटस यावर तेच नांव असते.हॉस्पिटलमध्ये पण बाळ आणि आईच्या रुमबाहेर त्या नावाची प्लेट लावतात.तसेच बाळाच्या हॉस्पिटलमधल्या बेडला पण नांवाची फित लावतात.

   पुढे तुम्ही कितीही मोठं बारसं करुन वेगवेगळी नांवे ठेवली तरी पोर्टलचं नांवच कायम राहतं.

इकडे बाळाच्या जन्मानंतर तीन दिवसांच्या आत गव्हर्मेंट अॉफीसला जाऊन फाॅर्म भरावा लागतो.तो फॉर्म भरल्यानंतर चार पाच दिवसांनी बाळासाठी एक गिफ्ट पार्सल पाठवतात.त्यानंतर आठवडभरातच बाळाच्या जन्मनोंदणी झाल्याचा एक नंबर मिळतो.आपल्याकडे जसा आधारकार्डचा नंबर असतो तसा.तो नंबर तुमची आयडेंटीटी ठरवतो आणि तुम्ही या देशाचे नागरिक असल्याचे दर्शवतो.

     अशा प्रकारे आई किंवा वडील दोघांपैकी एकजण जरी नेदरलँडसचा नागरिक असेल तर बाळाला जन्मत: नागरिकत्व मिळते.आमच्या बाबतीत जावई  पाचवर्षांपेक्षा तिथे रहात असल्याने त्यांना डच नागरिकत्व मिळाले.अजुन एक अट म्हणजे तुम्हांला डच भाषेच्या काही परिक्षा द्याव्या लागतात.त्यात डच लिहीणे,बोलणे ,इथलं कल्चर जाणुन घेणे,तुमचं संवाद कौशल्य,शब्दसंग्रह किती आहे याचा अभ्यास करावा लागतो.त्याच्या काही लेव्हल असतात त्याचे टप्पे पास करुन झाल्यावरच डच नागरिकत्वासाठी तसेच डच पासपोर्टसाठी अर्ज करता येतो.

  माझी लेक मात्र अजुनही भारतीय आहे.आणि तीला मात्र भारतीयच रहायचे आहे.इथलं नागरिकत्व ,आपलं भारतीयत्व सोडायची तीची अजिबात इच्छा नाही,तशी मानसिकता सध्यातरी नाही.आहे ना अभिमानाची बाब!

    तसेच तुम्हांला त्या देशाचे नागरिक होण्यासाठी डच मुलाशी किंवा मुलीशी विवाह केला तरीही त्या देशाचे नागरिकत्व मिळते.आणि शेवटचा पर्याय म्हणजे दत्तक जाणे.एखादं विदेशी मुल डच दांपत्याने दत्तक घेतल्यास त्यालाही डच नागरिकत्व मिळते.

    एकदा तुम्हाला डच नागरिकत्व मिळाले की मतदानाचा अधिकार प्राप्त होतो.तिथल्या सरकारी सुविधा मिळतात.तसेच तिथल्या सरकारी नोकय्रांमध्ये काम करु शकता. कायम तुम्ही नेदरलँडसमध्ये वास्तव्य करु शकता.

  इथल्या ज्या पब्लिकस्कुल्स आहेत त्यांना गव्हर्मेंट फंडींग असल्याने सगळ्याच मुलांना त्या पूर्णत: विनामुल्य असतात.येथे डच भाषेतच शिकवले जाते.शिक्षणाचा दर्जाही ऊत्तम असतो.दुसरी भाषा म्हणुन इंग्रजी ही भाषा शिकवतात. बहुतांश मुले डच शाळेतच शिकतात.काही प्रायव्हेट इंटरनॅशनल स्कुल्स पण आहेत पण त्या प्रचंड महाग आहेत.त्यांची फी न परवडणारी असते.

   इथली अजुन एक नवलाईची बाब म्हणजे बाळाची कारसीट.बाळ जन्माला येण्यापुर्वीच त्याची कारमधुन घरी येण्याची पुर्वतयारी करावी लागते.त्यासाठी इकडे कारसिट कंपलसरी आहे.कारसीटशिवाय बाळाने प्रवास केल्यास जबरदस्त दंड आहे.म्हणुन आधी कारसीट हवीच.बाळ अगदी पहिल्यांदा घरी आणतांनाही कारसीटमधुनच आणावे लागते,मांडीवर ठेवुन चालतच नाही.ही कारसीट बेल्टने कारच्या मोठ्या सीटला बांधायची.त्यात बाळाला ठेवायचे.आणि बाळाला पण कारसीटलला लावलेल्या बेल्टने आवळुन बांधायचे .दोन्हीही इतके करकचुन बांधायला लागते की कारसिट आणि आतले बाळ हलण्याची काय बिशाद! 

तसेच सार्वजनिक वहानातुन  प्रवास करतांना सुद्धा कारसिट अथवा बाबागाडी अती आवश्यक आहे.मागच्यावेळी नेदरलँडसवरुन बेल्जीयम असा बस प्रवास करतांना एका विदेशी महिलेकडे कारसीट किंवा बाबागाडी नसल्याने तीला तिकीट काढले असुनही बसमध्ये चढता आले नाही.ती महिला  अगदी गयावया करु लागली ड्रायव्हरपुढे तरीही तीला बसमध्ये चढु दीलेच नाही.नियम म्हणजे नियम त्यात बाळाच्या सुरक्षिततेची जबाबदारी महत्वाची!

     डच पासपोर्टही बाळाच्या जन्मानंतर तीन महिन्याच्या आत काढावा लागतो.त्यासाठी फोटो स्टुडीओत जाऊन फोटो काढणे,फॉर्म भरणे अशी सगळी  प्रोसेस करावी लागते.

 

*डच नागरिकत्व मिळालेल्या नागरिकांना 'नेदरलँडर्स' असे म्हणतात*.


     *सौ.पुर्वा लाटकर*

Comments