*पुन:श्च अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 3*
विमानात फारशी झोप लागलीच नाही.विमानातलं खाणंही फारसं सुखावह नव्हतं.रात्र सरली.सकाळ होताच विमानात अनाऊंन्समेंट झाली.थोड्याच वेळात विमान ऊतरणार होते.
विमान ऊतरतांना इथली जी पहीली झलक किंवा दृश्य असतात ना ती कायमच मन मोहवणारी असतात.ती वरुन दिसणारी छोटी ऊतरत्या एकसारखी रांगेत ऊभी असलेली छपरांची घरे.ते नागमोडी ,चकाकणारे कालवे.छोटे छोटे लेक्स,काळे डांबरी रस्ते,शिस्तबद्ध पद्धतीने चालणाय्रा गाड्या.कुठे ट्युलीप्सची शेते.सगळं जवळ जवळ येऊ लागतं आणि नेदरलॅंडसच्या हवेची सुखावणारी लहर मनांमनात लहरत जाते.
स्कीफॉल एअरपोर्ट अॅमस्टरडॅमला विमान लॅंड झालं.चालत चालत आणि एमिग्रेशन काऊंटर गाठलं.यावेळी मात्र एमिग्रेशन अॉफीसरने लेकाला ऊलटसुलट प्रश्न विचारुन भंडावुन सोडलं.त्यानेही तितक्याच हजरजबाबीने आणि चतुराईने ऊत्तरं दीली.आमचं परतीचं तिकीट दाखवल्यावर त्याचं समाधान झालं. आणि आमच्या पासपोर्टवर शिक्कामोर्तब केलं.हुश्श!असा सुस्कारा टाकत आम्ही बॅगांच्या बेल्टकडे निघालो.बॅगाही लगेच आल्या,ट्रॉलीवर टाकल्या आणि बाहेर पडणार तोवर कस्टम्स अॉफीसरने अडवलं.'I want you check your bags' असा काहीसा जरबेचा आणि धाक दाखवणीरा सुर होता त्याचा.बॅग मुलाने त्याच्या काऊंटरवर ठेवली.बॅगेत वरच्या थरावरच पीठं,मेतकुट ,भाजणी होती.त्या सगळ्याचा खमंग वासही सगळीकडे दरवळत होता.त्यावर इंग्रजीत लेंटील फ्लोअर,सागो फ्लोअर असं त्यांना समजेल अशा मोठमोठ्या आकारात लिहीलेली स्टिकर्सही चिकटवली होती.बहुतेक वासावरुन आणि नांवे वाचुन त्याने ऊघडलेली बॅग काही क्षणांत बंद केली.दुसरी बॅग तपासायची आहे का?असे विचारताच त्याने ,No,No.no need of that' असे बोलत दुसय्रा बॅगेकडे ढुंकुनही न बघता आम्हाला जायला सांगीतले.परत एकदा हुश्श करत ,मोठा सुस्कारा टाकत बाहेर पडलो. या गडबडीत आमची ट्रॉली कोणीतरी नेली होती.तशाच जड जड बॅगा ढकलत बाहेर पडत होतो.बॅग ढकलता ढकलता मीच बॅगेवर पडुन लोटांगण घातले.स्कीफॉल एअरपोर्टवर नतमस्तक झाले.दुखय्रा पायामुळे झालं असो.बाहेरच लेक जावई आम्हांला घ्यायला आले होते.त्यांना बघुन मी माझं दुखणं विसरले.बॅगा गाडीत टाकल्या आणि घराच्या दिशेने निघालो.
*सौ.पुर्वा लाटकर*
Comments
Post a Comment