*पुन:श्च अलिबाग ते अॅमस्टरडॅम*
पुन्हा एकदा अगदी आठ नऊ महिन्यातच लेकीकडे जायची 'गोड' संधी लगेचच मिळेल असं स्वप्नातही वाटलं नाही.पण तशी संधी चालुन आली आणि मागच्यावेळेसारखीच यावेळीही जायची लगबग सुरु झाली.
यावेळी जाण्याचा ऊद्देशही अगदी वेगळा असल्याने तयारीही त्यादृष्टीने चालु केली.
डींक,अळीव,खारीक पावडर, थोडे ड्रायफ्रुटस, (तीथे चांगले आणि भरपुर मिळतात म्हणुन) ओवा,बाळंतशोपा,काढे,गुटी,गुटी ऊगाळण्यासाठी छोटीशी सहाण..सगळ्या प्रकारची पीठं.झबली,टोपडी,कुंची,दुपट्यांचा भलामोठा ढीग,लंगोट
तीचे डोहाळे पुरवण्यसाठी म्हणुन राजपुरोहीतचं फरसाण,शेव,मिठाई,पेढे . चितळेची बाकरवडी,आंबा बर्फी,तयार भेळ व मिसळचं पॅकेटस.
यावेळीही सामानाची भर पडु लागली.बॅगा ओसंडुन वाहु लागल्या तसं आम्ही आमचे कपडे मोजकेच न्यायचे असे ठरले.
यावेळी लेकीची सक्त सुचना होती ,बॅगेचं वजन जास्त झालं तरी चालेल.अतिरिक्त शुल्क भरता येईल.असो.अंदाजाप्रमाणेच बॅगेचं वजन घरातल्या वजनकाट्यावर जास्तच भरलं.बघु एअरपोर्टला गेल्यावर असं ठरवलं.
*सौ. पुर्वा लाटकर*
Comments
Post a Comment