*पुन:श्च अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख ७*
*वाट पाहुन जीव दमला*
लेकीचं आणि आमचं रुटीन मस्त चालु होतं.आहार,विहार,योगा,गर्भसंस्कार.हवामान चांगलं असेल तर बाहेर पडुन थोडे चालायला जाणं.तर कधी घरातच पत्ते,लुडो ,सापशीडी सारखे खेळ खेळणं.नवनवीन पदार्थांनी तीचं कोड कौतुक करणं.एकंदर सगळं आलबेल होतं.दर आठवड्याला डॉक्टरांची व्हिजीटही चालु होती.
नववा महिना संपला.दीलेली तारीखही ऊलटुन गेली.तरीही काहीच गडबड' वाटेना.शेवटच्या डॉक्टरांंच्या व्हिजीटला सांगीतलं की तुला आता मोठ्या हॉस्पिटलची अपॉइंटमेंट देते .तु तिकडेच जा.
शनिवारची अपॉईंटमेंट मिळाली.हॉस्पिटल बरेच मोठे होते.तीथे पहिल्यादांच स्रिरोगतज्ञांशी भेट झाली.त्यांनी तपासुन पुढच्या शनिवारी अॅडमिट हो .काहीतरी ट्रीटमेंट देऊन प्रोसेस चालु करणार होते.
पुढच्या शनिवारी अगदी पहाटे सकाळी साडेसहाची अपॉईंटमेंट मिळाली.घरापासुन हॉस्पिटल पंचवीस तीस कि.मी.तिथे पोहचायलाच वेळ लागायचा.नेदरलँडसमध्ये कोणत्याही भेटीच्या वेळा,डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटस,क्लिनिकच्या वेळा काटेकोरपणे पाळाव्या लागतात.फारतर पाचच मिनिटं तुमची वाट पाहीली जाते.आणि अपॉईंटमेंट कॅन्सल केली जाते.परत ती कधी मिळेल याची शाश्वती नसते.यासाठी ती 'वेळ' गाठणं अत्यंत गरजेचं असतं.त्याप्रमाणे सहालाच घराबाहेर पडुन हॉस्पीटलला दाखल झालो.तीला अॅडमीट केलं.सोबत जावई होतेच.आम्ही बाहेरच थांबलो.काहीवेळाने ती म्हणाली माझ्यावर जी 'ट्रीटमेंट' होणार होती ती कॅन्सल झालीय .मला फक्त टॅब्लेट देऊनच पुढची प्रोसेस चालु करणार आहेत.यासाठी अॅडमिट व्हावे लागेल. तीचा निरोप घेण्यासाठी आम्ही तीच्या रुममध्ये गेलो अगदी पांचच मिनिटांसाठी तितक्यात तिथल्या नर्सने 'Too much rush here' असा टोमणा मारलाच.आम्हीही हॉस्पिटलमध्ये राहण्याच्या तयारीनीशीच गेलो होतो.हॉस्पीटलमध्ये एकच व्यक्ती थांबायला परवानगी असल्याने आम्ही घरी परतलो.
तिकडे हॉस्पीटलमध्ये तीची 'पुढच्या दृष्टीने 'प्रोसेस चालु केली.आता ती अॅडमीट झाल्याने आम्ही निर्धास्त होतो.केंव्हाही 'गोड' बातमी कानी येईल याची वाट बघत राहीलो.अर्थात या सगळ्यासाठी चोवीस ते अठ्ठेचाळीस तास लागतात याची कल्पना होती.
तो दिवस पार पडला.रवीवारही गेला.लेक कळा देऊन दमली होती.इथल्या डॉक्टरांचा नैसर्गिक प्रसुतीवर भर असल्याने अॉपरेशचा विचारही करत नाहीत.शेवटी तीला अॉक्सीटोसिनचं इंजेक्शन दीलं गेलं.त्याबरोबर शांत समुद्रात जशा अचानक मोठमोठ्या लाटा याव्यात त्याप्रमाणे 'पेन्स' सुरु झाले.बाळाच्या ह्रदयाचे ठोके वाढले,त्याचं बी.पी.वाढलं .श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.तो चिमुकला जीव आतल्या आत,घुबरला,गुदरमला.अशा या क्रिटीकल सिच्युऊशनमध्ये सगळ्यांचीच धावपळ ऊडाली.तीला अचानकच अॉपरेशन टेबलवर घ्यावे लागले.तीच्याही अंगातली शक्ती कमी झाली होती.एकदाचं अॉपरेशन करुन बाळ बाहेर काढण्यात यशस्वी झाले डॉक्टर.पण त्याची तब्येत काही तितकीशी बरी नव्हती.सलाईन,अॉक्सिजन लावण्यात आले.दोन दिवस जरा चिंतेचेच होते.बाळाला अतिदक्षता विभागात ठेवले गेले.सगळे स्पेशालिस्ट येऊन तपासुन जात होते.इथे नॉर्मल डिलिव्हरी झाली की तीन तासात सोडतात.अॉपरेशन झाल्यावर अठ्ठेचाळीस तासांनी घरी सोडतात.दोन दिवसात बाळाची तब्येत व्यवस्थित झाली.सगळे रिपोर्टस नॉर्मल आले.तिसय्रा दिवशी लेक बाळाला घेऊन घरी सुखरुप आली.
इथे अनेक प्रश्न पडतात .नॉर्मल डिलिव्हरी होत असतांना.अचानक अॉक्सीटोसिन द्यायची गरज होती का? बाळाच्या जीवाला त्रास होईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत वाट का पाहिली?नऊ महिने नऊ दिवस अगदी असोशीने सगळी पथ्य सांभाळुन जपलेल्या आईच्या शरीराची,मनाची हेळसांड का करायची? अॉपरेशच करायचं तर आधीच निर्णय का नाही घेतला? त्यामुळे मन व शरीर आणि बाकीचे नातेवाईक यांची तयारी असते. बाळाच्या तब्येतीवर बेतेपर्यंत निर्णय लांबणीवर का टाकला? असे अनेक प्रश्न पडतात.तीच्या इतर मैत्रिंणाचाही हॉस्पिटल ,डॉक्टर आणि ट्रीटमेंटच्या बाबतीतला अनुभव फारसा चांगला नाही.प्रत्येकीची एक वेगळीच कहाणी आहे.असो.शेवट गोड तर सगळंच गोड असं मानुन सगळं सोडुन दीलं
*सौ.पुर्वा लाटकर*
Comments
Post a Comment