*पाय चालती वारी*

*मुखी रामकृष्ण हरी*

*ओढ जीवा पंढरपुरी*

*माझी वारी चाले निरंतरी*

*आम्याच्या खोल गाभारी*

*एक विठु सावळा हरी*

*तोच मजला तारी*

*चुकवे जन्म मरणाची फेरी*

*याच साठी केवळ हि फेरी*

*गळाले आत्मभान परी*

*देखीला कळस दुरवरी*

*नाही भेटी ऊराऊरी*

*समाधान पावलो अंतरी*

*भवभय पळाले दूरी*

*जातो बा माघारी*

*घेतली वर्षभराची शिदोरी*

*येईन परतोनी चंद्रभागेतीरी*

*जड झाले मन परतवारी*


*सौ पुर्वा लाटकर*



Comments