*पुन:श्च अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख५*
*मेडीकल इन्शुरन्स*
युरोपमधील वैद्यकीय व्यवस्थेविषयी थोडेसे.
युरोपमधल्या कोणत्याही देशात तुम्ही रहायला आलात की आधी मेडीकल इन्शुरन्स कंपलसरी काढावाच लागतो.त्या इन्शुरन्सचा हप्ता तुमच्या पगारातुन कापला जातो.इन्शुरन्स घेतांना पण त्यात सगळ्या मेडीकल ट्रीटमेंट समाविष्ट आहेत अथवा नाहीत ते बारकाईने बघावं लागतं.डच नागरीक आणि बाहेरच्या देशातुन आलेले नागरीक सगळ्यांना सारखाच इन्शुरन्स असतो.
एकदा तुम्ही मेडीकल इन्शुरन्स घेतला की तिथल्या गव्हर्मेँट पोर्टलला तुमचं नांव रजीस्टर होतं.तुम्ही कोणत्या एरीयात राहता त्याप्रमाणे तुम्हांला आठ ते दहा किमी च्या परीसराला एक डॉक्टर अपॉईंटकरुन दीला जातो.या डॉक्टरला जी.पी.किंवा जनरल प्रॅक्टीशनर असा असतो.तुम्हांला काही झालं.आजारी पडलात,कोणतीही इमर्जन्सी आली तरी केवळ या जी.पी.कडेच जावं लागतं.
अर्थात जी.पी.ची भेट घेणंही सोपी बाब नाही.आधी तुम्हांला फोन करावा लागतो.तो फोन एका आन्सरिंग मशीनला जोडलेला असतो.त्यावर तुम्हांला काय होतंय,लक्षणे काय आहेत?कोणता आजार आहे?इमर्जन्सी आहे का?अशा अनेकविध प्रश्नांची ऊत्तरे त्या मशीनला द्यावी लागतात.त्या मशीनला समाधानकारक ऊत्तर दील्यावर असिस्टंटशी बोलावं लागतं.आपली गरज,निकड,ट्रीटमेंटची आवश्यकता सगळ्या गोष्टी तीच्या गळी ऊतरव्या लागतात.यात यशस्वी झालो तर ऊपकार केल्यासारखे ती जी.पी.ची अपॉईंटमेंट देते.
अपॉईंटमेंट तर मिळाली .पण एवढं हुरळुन जावु नका.ती अपॉइंटमेंट कधी आठ दिवस,दहा दिवसांनंतरची तर कधी कधी महिनाभरानंतरची देखील असु शकते.
तुम्हांला जर ताप,सर्दी,खोकला किरकोळ अंगदुखी अशी लक्षणे असतील तर आठ दिवसांनी बरी देखील झालेली असतील.मग अपॉईंटमेंटचा काय ऊपयोग?
बरं एवढं सगळं होऊनही तुम्ही गेलाच जी.पी.कडे तरीही केवळ आणि केवळ पॅरासिटॅमॉलच्या गोळ्या देण्यात येतात.त्या ही इतक्या माईल्ड असतात,की त्याचा तात्काळ परिणाम दिसणारच नाही.
सर्दी तापाची ही ट्रीटमेंट तर बाकी दातदुखणे,दाढ दुखणे,एखादा मोठा आजार यासाठीची अपॉइंटमेँट कधी द्यायची,द्यायची की नाही याचा अधिकार जी.पी.कडेच असतो.मंदीरात जसं नंदीला हात लावुनच पुढे देवाकडे जावं लागतं तसाच हा काहीसा प्रकार!
तसं बघीतलं तर इथले लोक सुदृढ ,ऊत्तम आरोग्य असलेले,कोणता ना कोणता व्यायाम रोज करत असलेले,सायकल चालविणारे.तरीपण डॉक्टरांची गरज कधी ना कधी लागत असणारच.इथल्या लोकांना अशा ट्रीटमेंटची सवय असेलही पण आपल्या भारतीय मानसिकतेच्या अगदी विरुद्ध आहे हे!
अलिबागला आल्यावर ही बाब मला खुप जाणवली.अगदी मी राहते तिथुन काही पावलंवर अनेक डॉक्टर्स,स्पेशालिस्ट,लॅबोरेटरीज सहज ऊपलब्ध आहेत.अगदी तातडीची गरज लागली तरी रात्री अपरात्री वैद्यकीय मदत मिळणारच,डॉक्टर्स अॅव्हेलेबल असणार.हा केवढा मोठा दिलासा आहे!मला वाटतं हीच आपल्या देशाची श्रीमंती!तिथे वैद्यकीय शिक्षण घेणाय्रांचीच वानवा त्यामुळे सगळीकडेच ही ऊणीव जाणवते.
माझी लेक या व्यवस्थेला वैतागली होती.म्हणाली या बाबतीत तरी आपला इंडीया बेस्ट आहे!
*सौ. पुर्वा लाटकर*
Comments
Post a Comment