*पुन:श्च अलिबाग ते अॅमस्टरडॅम*
सध्या बेंगलोरला वास्तव्य असल्याने .बेंगलोर ..पुणे...अलिबाग....अॅमस्टरडॅम अशी प्रवासाची धावपळ होणार होती.
बेंगलोरवरुन पुण्यात आलो आणि जायची लगबग सुरु झाली.आणि एका संध्याकाळी गाडीवरुन (टु व्हीलर)वरुन जातांना एका व्यक्तीने विरुद्ध दीशेने येऊन जोरदार धडक दीली. काही कळायच्या आत.काही सेकंदातच.मी एका बाजुला ,मुलगा एका बाजुला मधे दुचाकी .असे भर रस्त्यात पडलो.सुदैवाने तेथुन कोणतेही मोठे वाहन जात नव्हते .थोडक्यात बचावलो.तसेच धडपडुन कडेला ऊभे राहीलो.ऊभं राहताक्षणीच लक्षात आलं ऊजवा पाय सुजलाय.चालता येईना.गाडी सुरु होईना.मुलाला काही लागलं नव्हतं.गुडघ्याच्या खाली खरचटलं होतं.थोडा मार बसला होता.मला मात्र चालता येईना.तशीच लंगडत घराजवळच्या डॉक्टरांकडे गेलो.एक्स रे काढला.बँडेड बांधलं. टी.टी. चं इंजेक्शन दीलं आणि घरी आलो.नेदरलँडला जायच्या पंधरा दिवसापुर्विची ही घटना.
पडल्याक्षणी मनांत हाच विचार आला जाता येईल ना लेकीच्या बाळंतपणासाठी?पायाचं दुखणं वाढणार तर नाही ना,चालता येईल ना?अशा अनेक विचारांच्या गुंत्यात मन अडकलं.
पण माझी इच्छाशक्ती जबरदस्त होती.मला काही झालं नाही.थोडंसंच लागलंय असं सतत लेकाला सांगत होते.तो मात्र मनांतुन घाबरला होता,माझ्यामुळे आई पडली असा काहीसा अपराधी भाव त्याच्या मनात होता,
दुसय्रा दीवशी बाळंतपणाच्या खरेदीसाठी जायचे होते.पण मला घरातल्या घरात चालणेही अशक्य वाटत होते.यावर तोडगा शोधुन काढला.मुलगा म्हणाला 'मी मावशीसोबत सगळी खरेदी करुन येतो'तु निश्चिंत रहा.
दीलेल्या यादीनुसार पुण्यातली खरेदी पार पडली.बहीणीला पुण्यात कुठे काय वस्तु,कपडे दर्जेदार मिळतात हे पक्कं ठाऊक असल्याने खरेदी पटकन झाली.
इकडे लंगड्या पायाने स्टुलावर बसुन मी मेतकुट,ऊपवास भाजणी,थालिपीठ भाजणी,चकली भाजणी तयार केली.याच बरोबर बाजरी,ज्वारीचं पीठ अशी पीठं तयार करुन घेतली.
पुण्यातली खरेदी आटपुन आता अलिबागकडे प्रस्थान केलं.पाय अजुनही सुजला होता,दुखत होता.
अलिबागला आल्यावर आधी डॉ.साठेंचं हॉस्पिटल गाठलं.पुन्हा एक्स रे काढला.डॉक्टरांना माझ्या नेदरलँडस प्रवास करत येईल ना ?याची शंका विचारली.डॉक्टरांनी एक्स रे बघीतला हेअरलाईन फ्रॅक्चर होतंच.त्यांनी एक विशिष्ट प्रकारचे बँडेज माझ्या पावलाला लावुन दीले.काही औषधे दीली.आणि बिनधास्त जा नेदरलँडसला असा ग्रीन सिग्नलही दीला.मी मात्र आता मनातल्या मनांत आनंदाने ऊड्या मारु लागले.खय्रा ऊड्या महागांत पडल्या असत्या ना!असो.
तर ही होती नेदरलँडसला जाण्याच्या आधीची परिस्थिती.
दुखय्रा पायाने आणि पिसासारख्या हलक्या मनाने जड जड बॅगा घेऊन आम्ही मुंबई एअरपोर्टला जाण्यासाठी सज्ज झालो.यावेळी नवखेपण,बावरलेपण नसल्याने नेहमीचे प्रवासी असल्यासारखे आम्ही वावरत होतो.चेकईनसाठी रांगेत थांबलो.वजन जास्त भरले.त्याचे पैसे भरुन पावती घेतली.यावेळीही फक्त लॅपटॉप बॅग आणि पर्स जवळ होती.बाकी सगळं सामान चेकईनमध्ये टाकले होते.त्यामुळे ओझं नव्हतंच.सिक्युरीटी चेक,एमिग्रेशन सगळे सोपस्कार पार पाडुन गेटकडे निघालो.हळुहळु पावलं टाकत ,ठिकठिकाणी बसत गेटजवळ येऊन पोहोचलो.थोडंसं खाऊन,चहा घेतला आणि बोर्डिंगची वाट पाहु लागलो.बोर्डींगसाठी रांगेत थांबलो असतांना पावलातुन असह्य कळा येऊ लागल्या.ऊभे राहणेही अशक्य होऊ लागले.कधी एकदा विमानात जाऊन बसतो असं झालं.विमानात बसल्यावर पायातले शुज काढुन टाकले त्यामुळे थोडंसं हायसं वाटलं.
विमान धडधडु लागलं.रनवेवरुन धावु लागलं.चमचमते लाईटस बघत असतांनाच आकाशात झेपावलं.आकाराने लहान लहान होत जाणारी चकाकती मुंबापुरी काही वेळातंच दिसेनाशी झाली.
*सौ.पुर्वा लाटकर*
Comments
Post a Comment