*पुन:श्च अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख ९*
*दिलासा देणारी सोय*
हॉस्पिटलचा अनुभव जरी फारसा सुखद नसला तरीही पुढचा अनुभव खुपच दीलासादायक होता.
एक म्हणजे क्रामझोर्गची सुविधा.दुसरं असं की एकदा बाळ,बाळंतीण घरी आले की त्यांना पुन्हा कोणत्याही चेकअपसाठी पुन्हा हॉस्पिटलची वारी करावी लागत नाही.
डिलिव्हरी झाल्यावर क्लिनिकला जी डॉक्टर असते ती स्वत:च घरी येते.आईची तब्येत बघते.तीला कोणता त्रास होतोय का?तीच्या अडचणी कोणत्या आहेत हे जाणुन घेते.
बाळासाठी पण आधी जी.पी.घरीच येतात.बाळाचं वजन ,त्याची तब्येत,टेंपरेचर मोजतात.तोंडावाटे द्यायचे ड्रॉपस लिहुन देतात.
बाळाला कानाने ऐकु येतंय की नाही नीट हे तपासण्यासाठी पण डॉक्टर घरीच आले होते.
ब्लडटेस्ट करायला पण घरीच लॅबवाले आले होते.बाळ दुध निट पितंय की नाही यासाठी फिडींग एक्सपर्टस असतात ती पण घरीच आली होती.
एकदा तर रात्रीत बाळाचं टेंपरेचर वाढलं होतं .त्याला तपासायला पहाटे साडेचार वाजता डॉक्टर आल्या होत्या.त्या पुढे दोन तीन तास थांबुन सगळं नॉर्मलला येईपर्यंत थांबल्या होत्या.लस येथे लवकर दीली जात नाही.तीन महिन्यानंतरच सुरवात होते त्यामुळे तीन महिनेतरी बाळाला घेऊन हॉस्पिटलला जावे लागत नाही.
बालरोगतज्ञ पण येऊन चेक करुन गेले.त्यांचही क्लिनिक घरा पासुन पाच दहा किमी च्या आतच असते त्यामुळे एकदा त्यांच्याकडे नोंद झाली की मुल मोठे होईपर्यंत काही बघावे लागत नाही.
तिथल्या सतत बदलत्या हवामानामुळे ही सोय छान वाटते.पाऊस,थंडी,वाय्रात न जाताही घरी ट्रीटमेंट मिळते.
अशी सोय भारतातही मिळायला हवी असं वाटतं .गर्दी,ट्रॅफीक ,इतर अनेक इन्फेक्शन पासुन आई आणि बाळाला दुर ठेवता येईल!बरोबर ना!
*सौ.पुर्वा लाटकर*
Comments
Post a Comment