*पुन:श्च अलिबाग ते  अॅमस्टरडॅम* *लेख ४*


*मिडवाईफ*

      

इकडे तुमची 'गुडन्युज' कळाल्यानंतर एका जवळच्या क्लिनिकला तुमची नोंद होते.पुढची सगळी तपासणी ,सोनोग्राफी सगळं इथेच होतं.इथे तुम्हांला 'मिडवाईफ' कडुन सगळी ट्रीटमेंट दीली जाते.ती

ही मिडवाईफ स्रिरोगतज्ञ डॉक्टर आणि पेशंट यातला दुवा असते.ती एक  शिकलेली तज्ञ नर्स असते.पेशंटला तपासणे,तीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे.तीला योग्य ती माहीती देणे.तीचे ब्लड रिपोर्टस ,सोनोग्राफीचे रिझल्टस बघुन त्या नुसार निर्णय घेणे.तुलनेने सहज सोप्या अशा डिलीव्हरीज करणे.बाळ व आईची नंतरची काळजी ,त्याची तपासणी हे सगळं मिडवाईफच्या अखत्यारीत येतं.

मोठी अॉपरेशन्स,गुंतागुंतीच्या केसेस,अवघड केसेस मध्ये ती तुमची केस स्रिरोगतज्ञांकडे पाठवते. 

मिडवाईफ ही डॉक्टर नसते.पण ती बय्रापैकी तज्ञ असल्याने क्लिनिकला मिडवाईफकडेच अपॉईंटमेंट असते.

स्रिरोगतज्ञ हे मोठ्या हॉस्पीटललाच असतात.त्यांच्याकडे आपल्याला डायरेक्ट जाता येत नाही.

 मिडवाईफचे काम बहुतांशपणे महिलाच करतात.कधी काही ठिकाणी पुरुषसुद्धा मिडवाईफचे काम करतांना दिसतात.

       मिडवाईफ पण पेशंटची सगळी माहिती पोर्टलला फीड करत असते.त्यामुळे गायनॅकला पण पेशंटच्या तब्येतीबद्दल माहिती असते.

स्मार्ट ,चटपटीत,चुणचुणीत  गोय्रापान डच मुली किंवा महिला मिडवाईफचे काम आनंदाने करतांना दिसतात.


 *सौ.पुर्वा लाटकर*

Comments