आश्विनी

 आश्विनी....

  लेखणी असतेच मनांत 

आपल्याच खोल खोल ह्रदयांत

बिनधास्त ऊतरव तु कागदांत

मनाचा हळुवारपणा,निर्मळपणा

थोडासा  बंद दरवाजा 

आपणच ऊघडायचा

ऊतरत जायचे आत ,अगदी आतपर्यंत

झरा झुळझुळत असतो

तो वाहता होतो

शद्ब शब्द गवसत जातात

लेखणीतुन बाहेर पडुन

रीते होत जातात

एकदा वाट गवसली की

तीचा मागोवा घेता येतो

छोट्याश्या पायवाटेचा मग 

राजमार्ग बनुन जातो

 बघ....लिहिता लिहीता सुचु लागतं

सुचलेलं मोबाईलवर टायपु लागतं.

........म्हणुन तरी लिहीच!


सौ.पुर्वा.

Comments