सकाळी झाडामाडाच्या आडुन हळु वर येणारा केशरी तेजस्वी गोळा
सकाळच्या कोवळ्या ऊन्हांत मातीत 'सन बाथ' घेणाय्रा ,चिवचिवणाय्रा चिमण्या
माडाच्याच मधल्या किनारीवर तोल सावरत आपल्या हुंकाराने परीसर दणाणुन सोडणारा भारद्वाज
दुरवर तसाच आवाज जणु जुगलबंदीच
पाणकोंबड्या क्वॅक क्वॅक करत
आरामात चालताहेत
नाचरा आपले पंख नाचवत फांदी फांदीवरुन नाचतोय
कधी जोडीने तर कधी एकटा
सोबत सुरांची सुरावट असतेच
एखादा बुलबुल डोक्यावरचा तुरा मिरवत कोवळ्या ऊन्हांत अंग फुलवुन बसलंय
सनबर्डस फुलांतला मध चाखण्यासाठी फुलझाडांवर झेपावत आहेत
आकाशात किर्रर किर्रर असा आवाज काढत हिरव्या राव्यांचा थवा शेताकडे निघालाय
कावळे ,कबुतर यांचीही हजेरी असतेच या सगळ्यांत
कुंपणावरचा सरडा रंग बदलवत भक्षावर टिपुन बसलाय
खारुताई झुबकेदार शेपटीसह सर्रर सर्रर पळताहेत
कधी कधी मुंगसांची अख्खी पलटन शिस्तीत जातांना दिसते
नाहीतर एखादे मुंगुस झुपकन झाडीत लपते
असंख्य पक्षांचे गोड किलबिलाट सतत कानी येत असतात.
एव्हांना केशरी गोळा बराचसा वर येऊन आपली ड्युटी बजावायला लागतो
अशी ही निवांत,एकांतातलीअलिबागची सकाळ
तनांमनात झिरपत जाते.
दिवसभरासाठी तरतरीत ठेऊन जाते.
सौ.पुर्वा लाटकर
Comments
Post a Comment