एक होता टकलु हैवान
मिशा त्याच्या तिर कमान
जाता येता मिशा फेंदारी
बायकोवर उगाचच डाफरी
जाई बिचारी घाबरून
पदराआड बसे लपून
लेक त्याचा त्याच्यासारखा
बापाचा चालवी वारसा
मातेला करून टाकली मुकी मुकी
असली कसली ही मर्दुमकी
येईल जगासमोर नाचक्की
होईल बाप लेकाची फजिती
सौ .पूर्वा लाटकर
Comments
Post a Comment