चित्र काव्य

 असा कसा हा पुरुषी ताठा 

जसा मोठा तसा छोटा 


एक पत्नीला ठेवे नजरेच्या धाकात 

दुसरा तिची जीभ ठेवे ताब्यात 


अबोल बिचारी मुकी आंधळी 

 हरवे अस्तित्व दोघात


विसरली स्वतःचे भान

स्वत्वाचा अभिमान


अबला ही हताश नारी 

फुंकावी तीने हृदयाततून तुतारी



  उलथून टाकावी पुरुषी सत्ता 

घ्यावा हाती हुकूमाचा एक्का 


तेव्हाच होईल स्त्री स्वतंत्र 

होईल मुक्तता या गुलामीतून.


सौ. पूर्वा लाटकर

Comments