प्रत्येकाच्याच बालपणात एकतरी चिमणी असतेच.चिऊ काऊ च्या गोष्टी ऐकतच आपण मोठे होत असतो. त्यातल्या काऊची आठवण कधीच पुसून जाते.चिमणी मात्र सतत मनात चिवचिवत असते.काहीतरी संदर्भ येऊन चिमणी चिवचिवत असते. वैयक्तिकरीत्या बोलायचे झाल्यास मला मात्र चिमणी खूप आवडते . इतर पक्षांच्या.मनाने अगदीच साधी छोटा आकार असलेली ,रंगही करडा, राखाडी खूप.आकर्षक नसलेला.
चिमणी तर अगदीच साधी त्यामानाने चिमणा अंगावर पट्टे असणारा थोडा डार्क रंगाचा , आकाराने मोठा असतो. चिमण्यांचा चिवचिवाट मात्र कुठही कानी पडला की लक्ष वेधून घेतो.चिमण्यांना तापकीर असेही नाव आहे . असे मला आताच समजले.
लहान चणीच्या मुलींना ' ए चिमणे असे बोलावतात.
बडबड्या लहान मुलींना ' काय चिमणीसारखा 'चिवचिवाट करताय? असे म्हटलं जातं. कोणी उगाचच निराश बसला असेल तर काय ' चिमणी एवढं ' तोंड करून बसलाय असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीला अगदी साधा, भोळा संबोधायचे असेल तर 'चिमणी सारखा गरीब 'असे म्हणले जाते.कोणी कामात खूपच धावपळ करत असेल तर 'चिमणीसारखी धावपळ चालली ' आहे असे म्हणतात .अगदी साधे सोपे घर बांधायचे असेल तर 'चिमणी सारख' घरटे बांधले असे म्हणतात.
लहान मुलांच्या खाऊला 'चिमण चारा ' असे म्हणतात.
पु.लं. देशपांडे यांच्या चितळे मास्टर या एका व्यक्तिरेखेच्या तोंडी शाळेतील मुलींबद्दल एक वाक्य आहे . ते म्हणतात ' या पोरी म्हणजे ओटीवर अंगणात बागडणाऱ्या चिमण्या चार दिवस माहेरच्या अंगणात नाचतील आणि एके दिवशी सासरी फुरर उडून जातील.'
असे अनेक संदर्भ चिमणी बद्दल आढळतात.चिमणी अशी मग चिवचिवत राहते मनामनांत .अशा या चिमणीला जपुया!निसर्गात आणि मनांत.एक घोट पाणी आणि थोडा चारा ठेवूया! चला चिमणी वाचवूया !
सौ. पूर्वा लाटकर.
Comments
Post a Comment