हाय .....
कितीदा तोडले
कितीदा घाव घातले
पाठीवरी खांद्यावरी
ओरबाडून माझे सगळे
न थांबले ते हात
संपवण्या निघाले
प्राण कंठाशी आले
परी आत आत खोल
जीवन जगण्याची उर्मी
दाटुन आली पुन्हा
फुलली पानापानांत
फळे ही बहरली
असंख्यात खोडखोडात
जीवन हे सरले समर्पणात
मानवा हो जागा ये आता भानात
सौ.पूर्वा लाटकर
Comments
Post a Comment