चित्र काव्य

 कुठुनसे एकुलते एक बीज

उडून आले वाऱ्यावरी 


नसे माती पाणी अन काही रुजाया 

न कोणी त्याची निगा करी


परी दुर्दम्य इच्छा शक्ती अंतरी

बीज फोडून आले वरी 


पिवळे धम्मक फुल इवलीशी पाने

पाहू लागली जगाकडे कुतुहलाने 


नसेल कोणी साथ द्याया

तरी एकटा खंबीर मी जगाया 


सौ. पूर्वा लाटकर

Comments