श्रावणातलं सकाळचं उन्हं
किती प्रसन्न ,आल्हाददायक
आनंदी आणि स्वच्छंदी
अशा या उन्हात नाही धुळ
नाही हवेत प्रदुषण
आहे केवळ मातीचा हवाहवासा गंध
ऊनही जणु काही वर्षा ऋतूने
न्हाऊमाखु घालून पाठवलंय
पावडर तीट लावून नटवलंय
अशा या बिलोरी उन्हात
हिरवाई पण झळाळते
सारी सृष्टी तेजाळते
असा हा श्रावण पवित्र
आणि शुद्ध सात्विक
घेऊन येतो सणवार
मग काय मंडळी
आहात ना तुम्ही
स्वागताला तयार?
सौ.पूर्वा लाटकर
Comments
Post a Comment