वारी विठ्ठलाची

 *माझी वारी चालत असे निरंतरी

हृदयापासून हृदयांतरी 


प्रत्येक श्वास माऊली माऊली

हृदयाचा ठोका हर एक पाऊली



वारी आदीपासून अंतापरी 

कधी संपेल नाही जाण खरोखरी


एकादशी असेल शेवटचा दीस

जीव होईल भेटीसाठी कासावीस 


घेता कळसाचे दर्शन दुरुनी

वाटे भेटला  पांडुरंग मनी 


जातो परत माघारी देवा

चुकवावा जन्म  मरणाचा फेरा 


नको येणे परत फिरूनी 

चालावी पाऊले परतवारी



........अशी माझी वारी निरंतरी 

 हृदयापासून हृदयांतरी !


सौ. पूर्वा लाटकर

Comments