इवली लालचुटुक गुलाबकळी
हिरव्या पानाआड कांती नव्हाळी
दिसली मज प्रात:काळी
खुलली मनाचीही कळी
उमलेल ती पाकळी पाकळी
डोलेल ती फांदीवरती
सुगंध पसरवेल आसमंती
रवी आतुर पाहण्या तिला
ओलांडून येई क्षितिजी
होता त्यांची नजरानजर
लाजून अजून चूर रक्तिमा गाली
भवतलावरती पसरे गोड गुलाबी लाली
सौ.पूर्वा लाटकर
Comments
Post a Comment