*बहात्तर तरीही बेहत्तर*
सत्तर असो वा बहात्तर
आकडेच हे निव्वळ फारतर
थोडे खाली अथवा वर
उत्साहाची उणीव नाही तसूभर
सद्गुरूंचे लावून अत्तर
प्रवास आपला अविरत
सद्गुरूं विलिनात्मा स्वामी श्रीधर
आहे सदोदित यांचा वर
मनन , चिंतन, लेखन, नामस्मरण
श्ल़ोक मनाचे दासबोध अध्ययन
ध्यास अंतरी नित्यनूतन
देई सकळा अनुभव ज्ञान
लाभो निरामय आयुष्य निरंतर
विश्वस्त राहो हास्य मुखावर
सगुणाच्या पलीकडे निर्गुण निराकार
होऊ देत स्वप्न साकार
वरदहस्त राहो आमुच्या मस्तकावर
असावा आशिर्वच सर्व परिवारावर
अनेक अनेक शुभेच्छांसह ......!
*सौ.पूर्वा लाटकर*
*२.१०.२०२१*
Comments
Post a Comment