*अमृत योग..... पंचाहत्तरीचा*
अमृताचा दीस आला हो
क्षण भाग्याचा परमसुखाचा आला हो
जमले सगळे आप्तेष्ट, शुभेछुक हो
जीवन धन्य धन्य झाले हो
ति.आई बापूंची पूर्व पुण्याई मोठी
जबाबदार,खंबीर अन् प्रेमळ वहिनी (सौ.माधुरी) पाठी
मुकुल गायत्री केदार आरती निपजली गोमटी
नातवंडे अनिश,रिद्धी आणि अवंती छोटी
केले कष्ट अपरंपार
जोडले धन कुटुंबासाठी अपार
जरी असला "विक्रांतचा" व्यापार
तरी सोडला नाही सचोटीचा व्यवहार
माणसे जोडली निवडली विचक्षणे
वाचली सकळांची मने लक्षणे
दिला बहुमोल मदतीचा हात निरपेक्षपणे
नजर साऱ्यावरी वडीलकीची
प्रेमळपणे
केला विपुल ग्रंथांचा सखोल अभ्यास
झटला अहोरात्र करुनी अखंड सायास
लिहिला ग्रंथ वेचुनिया सारे सार समास
पुढील पिढीस देण्या आपला वारसा विचार
आजवर केली बहुतांची भ्रांत
नसे आता मनी कशाचीही खंत
वाटते रहावे एकांतात निवांत
चित्तवृत्ती होई स्थिर सद्गुरूचरणी शांत
रहावे "तरुण"वृद्धत्वाच्या" खुणा विसरुनी
असावे सदोदित प्रफुल्लित मनी
साक्षी भाव ठेवावा जीवनी
लाभो निरामय आरोग्य हीच ईच्छा स्वामीचरणी
*सौ.पूर्वा लाटकर*
*२ऑक्टोबर २०२५*
*अमृतमहोत्सव अर्थात पंचाहत्तरी*
Comments
Post a Comment