भिडेबाई

 *भिडेबाई वैशालीताई विजुताई*



ही एकाच व्यक्तिमत्वाची अनेक संबोधने .नाव उच्चारताच समोर एक टिप टॉप , नीटनेटकी साडी परिधान केलेली.चेहऱ्यावर प्रसन्नता असलेली मूर्ती डोळ्यासमोर येते.


भिडेबाई म्हणजे शिस्त ..मग ती घरातल्या डब्यांना  नांव,तारीख टाकून 

व्यवस्थित भरलेले यातही दिसते.त्या सुगरण असल्याने अनेक पदार्थ .खाऊ घालण्याची हौस!त्यांच्या कडच्या कोमसापच्या मीटिंग म्हणजे आमचे जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी असायच्या.प्रेमाने ,आग्रहाने सगळ्यांना खाऊ घालणं त्यांना आवडतं!


त्या आदर्श शिक्षिका आहेतच. मराठी आणि.संस्कृत या विषयात त्यांचा हातखंडा आहे.शिवाय अनुभवांचा , ज्ञानाचा खजिना त्यांच्याकडे आहे.अनेक उत्कृष्ट काव्य,कविता. विविध विषयांवर त्यांनी केलेले अभिवाचन,त्यातल्या आवाजाची चढ उतार,त्या भावना,शब्द आपल्यापर्यंत पोहोचवणे खरंच अवघड आहे .पण त्यांना ते छान जमतं.अनेक स्तोत्रपठण , त्यातले शुद्ध उच्चार, रसाळपणा आवाजातून पोहोचतो.


कोणाच्याही घरी रिकाम्या हाताने त्या कधी जात नाहीत.काहीतरी टिपिकल , स्पेशल खाऊ असतोच असतो.


समोरच्या व्यक्तीचे मन जाणून त्या अतिशय प्रेमाने, लाघवीपणे बोलतात.सहज हातात हात घेतात.कधी खांद्यावर हात टाकत थोपटतात. त्यांच्यातली  आपुलकी अशी सतत जाणवत रहाते.


इतरांना प्रोत्साहन देतात.कौतुक करतात. त्यांची पोस्ट वर प्रतिक्रिया आली की मस्त वाटतं.


गेली अनेक वर्षे कोमसापच्या विविध पदांवर काम करत असून त्या सगळ्या जबाबदाऱ्या  पार पाडत आहेत आणि सगळीकडे उत्साहाने भाग घेत आहेत.


त्यांना या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना निरामय दीर्घायु लाभो अशी सद्गुरूचरणी  प्रार्थना!


*सौ. पूर्वा लाटकर*


*५ऑक्टोबर२०२५*

Comments