नील नभासम मखर सजले
शेंदुरवर्णी गजानन विराजले
पितांबर तो गुलबक्षी
मुकुटावर मोरपंखी नक्षी
एके हाती मधुर मोदक
दुसरा तो देई आशीर्वच
जपाकुसुम दोन ताजे टवटवीत
तांबडे अन् सुवर्णी पिवळसर
पाने गर्द हिरवीगार रेखाटली
मनमोहक रांगोळी नटली
लेखन कला अन् बुध्दीचा दाता
देई सर्वांना निर्विघ्न आयुष्य आता
*सौ. पूर्वा लाटकर*
**६जानेवारी २०२६*
Comments
Post a Comment