काढत राहते ती रंगावली
आम्हीही लिहितो शब्दांच्या ओळी
तिच्या तरल नाजुक रेषा
आमच्या अक्षरांच्या रेषा
तिची गोलाकार वळणे
आमची मराठीची लिपी
ती भरते नानाविध रंग
शोधतो आम्ही तरंग
ती झर झर रेखाटते आकार
आम्ही देतो शब्दाकार
ती आमची काव्य जननी
तिच्या विना प्रतिभा उणी
तिच्या हातून प्रसवती
उत्तम उत्तम कलाकृती
तशी आमच्या हातून होऊदे
निर्मिती अनेक चारोळी कवितांची
*सौ.पूर्वा लाटकर*
*सौ.रसिका वहिनींना समर्पित*
*१८.१.२०२६*
Comments
Post a Comment