लाल चुटूक शोभे पितांबर
रक्तवर्णी जपाकुसुम मस्तकावर
वक्रतुंड तुझे रूप खरोखर
शुभ ऐकण्या कान थोर
.
एक हात देतो उंचावून वर
आवडता मोदक दुजे कर
फिरे स्वारी सदैव मुषकावर
करी भ्रमंती साऱ्या जगतावर
संकटातून नेई आता पैलपार
तूच आता एकमेव तारणहार
*सौ.पूर्वा लाटकर*
*माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा*
Comments
Post a Comment