*माणूस*
आयुष्यभर अनेक व्याप तापातून
जगत राहतो माणूस
अनेक नाती अनेक गोती
आप्तेष्ट अन् स्नेहीसोबती
जपतो,सांभाळत राहतो
वाढवतो,धीर,देतो,मदत करतो
आव्यापारेषु व्यवहारी जगात
अखंड फिरत राहतो माणूस
तो गेल्यानंतरही कामातून दशांगुळे
पुरून उरतो तो माणूस
त्याच्या आठवणींचे जिग सॉ पझल
जुळवत राहतो शोधत राहतो आपण
माणूस गेल्यानंतरही शिल्लक राहतो
*माणूस*
माणूस गेल्यानंतरही केवळ शिल्लक राहतो
*माणूस*
*सौ. पूर्वा लाटकर*
Comments
Post a Comment