रंगीत ठिपक्यांची रांगोळी

काढली गं  अंगणी


वाण घेण्या साऱ्या जणी

आल्या सख्या साजणी


नेसली चंद्रकळा पैठणी 

दिसे रूप लावण्यखणी 


नथ नाकात देखणी

खडे पाचू कोंदणी


भाळी चंद्रकोर गोंदणी

नजर न लावो कोणी 


*सौ.पूर्वा लाटकर*

Comments