इवलीशी नाजुकशी वेली 

हिवाने  गारठली 



दवाने  भिजली

स्वतःतच लपेटली 


स्वप्नांत दंगली

भावविश्वात रंगली



तरीही उमलली 

पाकळी पाकळी


हळदी कुंकूच्या रंगांत

केशरी परागाच्या धाग्यात


निळ्या मोरमुकुटाच्या तोऱ्यात

घेई उंच उभारी आसमंतात 



*सौ.पूर्वा लाटकर*

*८जानेवारी २०२६*

Comments