सोनेरी रविकिरणे पडता भूवरी
सूर्यफूल ते बघे उंच देठावरी
घेती सूर्याचे तेज त्यास अनुसरती
दिनभर राहती आनंदी अन् हसरी
बघून ते रम्य वातावरण राम प्रहरी
मयूरही पंख आपले हर्षाने पसरी
आकाशी जशी चढाओढ रंगांची
तशीच उधळण अंगणी रंगावलीची
*सौ.पूर्वा लाटकर*
*९जानेवारी २०२६*
Comments
Post a Comment