शेती गेली
माती गेली
राने गेली
वने संपली
डोंगर खणून
उघडे बोडके
सिमेंट मिक्सर
अवजड डंपर
जेसिबीचा पिवळा हात
शिरतोय खोल हृदयात
चहूकडे उंच उंच इमारती
माणसाची मजल आणखी वरती
नद्या नाले पावल्या
कचऱ्याने आकुंचन
वाहनांची अमाप गर्दी
चालताना येई अंगावरती
वेढले आसमंत धूळ धुराने
कोणाला द्यावे दूषण
विकास विकास विकास
पण सगळीकडेच भकास
माणसे हरवलेली कोशात
दिसती केविलवाणी उदास
कुठे चाललोय आपण
कशासाठी पळतोय?
एवढेसे आयुष्य जगण्यासाठी
ऊर फोडून घेतोय
उत्तर काही केल्या सापडेना
सिमेंटच्या या जंगलात हिरवाई दिसेना
*सौ.पूर्वा लाटकर*
Comments
Post a Comment