जल्लोष कवितेचा

 अक्षर अक्षर बने शब्द

शब्द शब्द मेळवी कविता


तशाच एक एक शब्दवेड्या

आल्या जमुनी वाचन करण्या


कधी लेख कधी कविता

साहित्याची वाहिली सरिता


निरामय आणि सुंदर वाचन

करती विचार आदान प्रदान


वये सगळ्यांची भिन्न तरीही

मने  एकाच साहित्य प्रेमावरती


आज घातला घाट कवितेचा

करू  जोशात जल्लोष कवितांचा 



आजच्या कार्यक्रमासाठी अनेक शुभेच्छा!

साऱ्या शब्द सख्याचं अभिनंदन!

🌹🌹🌹🌹🌹🌹


*सौ पूर्वा लाटकर*

*१८.२.२०२६*

Comments