राधा म्हणे....


ऐक ना श्रीरंग



लाव असा रंग


फिके पडतील सारे सप्तरंग



जो राहील सदैव संग 


होईन मी त्यात दंग




हरपूनी माझे अंतरंग



हृदयी उठतील भावरंग


नच करू मनोभंग 


राहीन मी अनंग 



तो एकमेव रंग


निव्वळ निर्भेळ प्रीतरंग....प्रीतरंग


*सौ.पूर्वा लाटकर*

Comments