विश्वात असती विविध रंग


मला भावती केवळ दोनच रंग


एक रंग श्याम रंग 

  


दुजा सावळा पांडुरंग


जयाचे नामे  तरले अभंग


भक्तजन माऊलीत दंग


एक विठू हर अंतरंग


लाभे जनांना  संतसंग


सावळ्यापरती  फक्त भक्तिरंग


ग्यानबा तुकाराम उठती तरंग



होऊन राहू जीवनी निःसंग 



*सौ.पूर्वा लाटकर*

Comments