किती धरू तुझी आस
किती करू तुझा धावा
येणारच तू नेमेची
सांगून गेला बहावा
अंदाज अल निनोचा
उमजेना माझ्या जीवा
होतसे काहीली चराचराची
करू लागले जन कांगावा
धाड एखादा जलभरा मेघ
तू येत असल्याचा सांगावा
किंवा झुळूक वादळी वाऱ्याची
मिळेल तप्त जीवास थंडावा
बरस असा मस्त बेभान बेधुंद
जलसाठा काठोकाठ भरावा
तरारून उठतील सारे प्राणी पक्षी अन् सृष्टी
देतील तुज मनापासून दुवा
कोंब मनीच्या या आशेचा
ओल्या मातीत रूजून यावा
ओल्या मातीत रूजून यावा.. ..
*सौ. पूर्वा लाटकर*
*१८जून२०२६*
Comments
Post a Comment