*कुठे जप तर कुठे अनुष्ठान*


*कुठे याचना तर कुठे गाऱ्हाणं*


*शेवटी आलाच तो धावून*

*बरसू लागला चिंब होऊन*


*शेती माती झाडे पाने गेली भिजवून*

*गाई,गुरे पशु पक्षी गेली सारी आनंदून*


*तापलेली जमीन गेली थंडावून*

*चराचर  निघाले सुस्नात नाहून*


*गार वारा अंगाला बिलगुन*

*जाई तन मन पूर्ण सुखावून*


*आता नको विसावा*

*तू असाच सतत पडावा*


*तहान साऱ्यांची भागू दे*

*पिकं जोमात येऊ देत*


*तुझ्यावर सगळी अवलंबून*

*तुझ्यामुळेच चाले जीवन*


*ठेव तुझी नजर  धरतीवर*

*वरुण राजा मागते एकच वर*


*सौ.पूर्वा लाटकर*

*२३जून२०२६*

Comments