*वारी....*


*एक वेडा वारकरी*

*गेला चालून पंढरी*


*थांबला दर्शना बारी*

*मुखी राम कृष्ण हरी*


*आतुर बघण्या सावळी*

*विठ्ठल मूर्ती गोजिरी*


*आला गाभाऱ्यात सामोरी*

*झाली जनांची रेटारेटी*


*ढकलला गेला मंदिरातुनी*

*दुःखे व्याकुळ झाला परी*


*अश्रू लागले झर झर झरू*

*बा विठू माऊली काय करू*


*मन शांत करण्या*

*विसावला चंद्रभागातीरि*


*शीतळ निर्मल जल धरी*

*दोन्ही कमलांवरी*


*काय आचरज झाले परी*

*दिसे जळात मूर्ती साजिरी*


*बघे एक टक रूप भरजरी*

*स्वर तोच उमटला बाहेरी*


*अरे मीच तुझा विठ्ठल हरी*

*भेटण्या मज आलास पायी दूरी*


*नसे मी केवळ गाभारी*

*आहे या पंढरीच्या चराचरी*


*या मातीत इथल्या शेतीत*

*दगडात अगदी कणकणात*


*इथल्या प्रत्येक जनात  मनांत*

*सगळीकडेच वसलोय सूक्ष्मात*


*अरे म्हणतोस ना मुखे हरी*

*बघ डोकावून तुझ्याच अंतरी*


*केली सदैव साथ तुझी खरी*

*चालतांना होतो तुझ्या अगदी बरोबरी*


*संतोषला समाधान पावला वारकरी*

*घातले लोटांगण त्या भूमीवरी*


*नाचू लागला हर्षाने परी*

*सांगे सगळ्यांना भेटला माझा हरी*


*तो एक वेडा...भक्तीत वेडा झालेला वारकरी*


*सौ.पूर्वा लाटकर*

*११जुलै २०२६*

Comments