ऐतिहासिक पुरातन बारव


वाटे गूढ एकाकी भयावह 


एके काळी असे वैभवात

 तुडुंब भरलेली सदोदीत


थंड सुंदर नितळ निर्मळ जल

भागवी साऱ्या नगरीची तहान


ललना येती पाणी भरण्या

अन् भरलेले मन रिते करण्या


कितीक दुःखे साठवली आडात

कितीक वेदना शमवल्या डोहात


काळाने  आपली कुस पालटली 

विहिरीची  अशी मग दैना झाली


ओसंडून वाहणारी  विहीर 

गेली खोल  खोल तळाशी


वाढली रान झुडुपे अन् वेली 

वटवाघळे मुक्त  संचार करती


विहीरीत अजूनही पाणी शाबूत आहे 

येईल कोणीतरी असा विश्वास आहे 



*सौ.पूर्वा लाटकर*


*२४ जुलै २०२६*

Comments