*अभय @५०*
*चि .अभय यशस्वी हाफ सेंच्युरीच्या मनःपूर्वक शुभेच्छा*
१६ जुलै रोजी बाळ एक जन्मले
गोरे गोमटे सुदृढ फारच देखणे
आजी,नाना,काका काकू आत्याचा लाडका तो नभा
लावला जीवापाड लळा आणि केले संस्कार सांभाळ
बारावी पर्यंतचे शिक्षण छान पार पडले
अभियांत्रिकी करता घर सोडावे लागले
सोसावे लागले खूपच सारे हाल
खाण्यापिण्याची आणि सगळ्याची आबाळ
तरी जिद्दीने केले शिक्षण पूर्ण
झाला उत्कृष्ट मार्काने उत्तीर्ण
वेध आता उत्तम नोकरीचे लागले
त्यासाठीही बरेच झगडावे लागले
नव्या पहिल्या वहिल्या नोकरीने दिला आयुष्याला आकार
सगळ्या कुटुंबासाठी केले नूतन वास्तूचे स्वप्न साकार
यथावकाश सुप्रिया सोबत गाठ बांधली
तिनेही गृहिणी होऊन सारी सूत्रे निभावली
अद्वैतच्या दुडूदुडू पावलाने झाले घराचे नंदनवन
सगळ्या कुटुंबासाठी आता सार्थ जीवन
शांत,मितभाषी आणि निगर्वी स्वभाव
नाही केला कधी त्याने माझा तुझा दुजाभाव
कधी नसे कोणती तक्रार आणि बरोबरी
प्रामाणिक परिपक्व पाय सदा जमिनीवरी
नसे कर्तुत्वाचा अभिमान वृथा आविर्भाव
सगळी सुखे मिळवूनही व्यक्तिमत्वात असे ठहराव
सगळ्यांच्या मदतीला जाई सत्वर
नसे मग चिंता तन मन धन लावे
तत्पर
सगळी नाती जपलीस सगळ्यांना बांधून ठेवलेस
देशमुखांचाही लाडका जावई बनलास
अद्वैत पण निपजला गुणी हुशार बुद्धिमान चौकस
जोपासला आपला ताऱ्यांचा छंद सांभाळून अभ्यास
अजयसाठी लावला हातभार
आई बाबांचा कमी केला शीणभार
वयाच्या या टप्प्यावर काही असेल मिळाले
असेल आणखी बरेच साध्य करायचे
आता थोडा निवांत हो स्वतःसाठी वेळ काढ
नाती,जबाबदाऱ्या,काम यातून स्वतःची जप आवड
मिळो आरोग्य,धन, संपदा,वैभव
ईच्छा साऱ्या पुर्णत्वास जावोत
अशी सद्गुरू साईचरणी सदिच्छा!
*सौ.पूर्वा लाटकर*
*२९ जुलै २०२६*
Comments
Post a Comment