*मुकुल@५०*
*सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या काव्यमय शुभेच्छा*
*चेहऱ्यावरती हसू निरंतर,गालावरती सुंदर खळी*
*खट्याळ ,मिश्किल, आश्वासक भाव व्यक्तिमत्वाची वेगळीच कळी*
*आजी आजोबा आई बाबा आत्या काकांचे संस्कार लाभले*
*स्वामीजींमुळे दासबोध, मनाचे श्लोक मनांत रुजले*
*सुवर्ण जसे झळाळते तावून सुलाखून*
*तसा घडला तो शिस्त ,धाक आणि प्रेमातून*
*मुळातच तैलबुद्धी अभ्यासू आणि चौकस हुशार*
*प्रयोगशीलता , अन् कल्पकतेची आवड त्याचा सर्वत्र वापर*
*दहावीच्या गुणवत्ता यादीत झळकले नाव*
*चहुबाजूंनी झाला कौतुकाचा वर्षाव*
*बारावीत हीच यशाची पुनरावृत्ती*
*अभियांत्रिकीला प्रवेश मिळवून झाली करिअरची खात्री*
*MNC मध्ये पहिलीच नोकरी लागली*
*परदेशाची दारे सहज खुणावू लागली*
*नोकरी संभाळून,धावपळ करत कष्टाने MBA केले*
*व्यावहारिक आणि वैयक्तिक आयुष्याचे नियोजन आत्मसात केले*
*पंख घेती सतत गगन भरारी,कधी मायदेशी तर कधी विदेशी*
*पण ओढ कायम स्वतःच्या उबदार घरट्याची*
*न्यू अजंठा मध्ये नव्या वास्तूत प्रवेश पूजा केली*
*काहीच दिवसांत आरती हिरकणी माप ओलांडून आली*
*सुखाचे नवे पर्व,नवी आशा,नवी स्वप्ने पहिली*
*आईवडिलांच्या तब्बेतीची जबाबदारीही समर्थपणे पेलली*
*सगळीकडेच झगडत राहिला एकट्याने तोंड देत राहिला*
*नाही सांगितले शल्य काही ,नाही सांगितली व्यथा जगास भासे तो सुखी सर्वदा*
*रिद्धीच्या रूपात आली गोड गोबरी गुलाबी परी*
*सगळे तिला वाढवायला सज्ज झाले आपापल्यापरी*
*सगळ्यांच्या कसोटीस तीही उतरली*
*गुणी,लाघवी,संस्कारी ,हुशारी तिने दाखवली*
*छंद जोपासला ट्रेकिंगचा, फोटोग्राफीचा*
*तसाच सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा*
*पुत्र, पति,पिता असा सद्गुणी, सदाचरणी ,सद्वर्तनी लाभावा*
*सगळ्या आप्त इष्टमित्र, परिवार,शेजारी यांना आपलासा , आवडता वाटावा*
*तुझे गुण वर्णन करण्या शब्द पडती तोकडे*
*काय अन् किती लिहावे ,लिहिले मी थोडके*
*सुयश, सुकीर्ती ,वैभव,निरामय आरोग्य सारे वांछीलेले लाभू दे*
*सगळं मिळवताना आपली माणसे सदोदीत जवळी राहू दे*
*सद्गुरू विलीनात्मा आणि सद्गुरू श्रीधर स्वामी , परमपूज्य मोरेबुवा यांचे नित्य आशीर्वाद मिळावेत*
*तुझ्याही अध्यात्मिक प्रगतीचा वारसा अखंड चालू राहू दे*
*अनेक मनःपूर्वक शुभेच्छा*
*सौ.पूर्वा लाटकर*
*दिनांक ५ ऑगस्ट २०२६*
Comments
Post a Comment